KS Bharat Debut : केएस भरतला नागपूर कसोटीत पदार्पणाची संधी, जाणून घ्या त्याची आतापर्यंतची कामगिरी

India vs Australia: केएस भरतला नागपूर कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. याआधी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

Continues below advertisement

KS Bharat in Team India : बहुप्रतिक्षित अशी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवला जात आहे. सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत असून भारतीय संघात दोन खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. सूर्यकुमार यादवसह यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएस भरत (KS Bharat) या सामन्यातून पदार्पण करत आहे. भारताचा फुलटाईम कर्णधार ऋषभ पंत सध्या संघाबाहेर असल्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात कोण असणार हा प्रश्न होता. ईशान किशन आणि केएस भरत यांच्यापैकी एकाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार होती. पण अखेर कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने केएस भरतवर विश्वास दाखवला आहे.

Continues below advertisement

केएस भरत भारताकडून लिस्ट-ए सामन्यांव्यतिरिक्त आयपीएलमध्ये खेळला आहे. केएस भरतने 2021 च्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. याशिवाय केएस भरतला अद्याप भारताकडून एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. तसंच आंध्र प्रदेश व्यतिरिक्त पूर्व विभाग, दक्षिण विभाग, दिल्ली कॅपिटल्स, रेस्ट ऑफ इंडिया इंडिया रेड, इंडिया ब्लू, इंडिया बी, इंडिया ए, बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांसारख्या संघांसाठी देखील भरत खेळला आहे. 2022 च्या आयपीएलमध्ये भरतनं आरसीबीकडून वाखाणण्याजोगी खेळी केली होती.

केएस भरतची कारकीर्द

केएस भरतने 86 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने 4707 धावा केल्या आहेत. या दरम्यान, केएस भारतचा स्ट्राइक रेट 59.8 आहे. याशिवाय या यष्टीरक्षक फलंदाजाने लिस्ट-ए सामने आणि देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाने 64 लिस्ट ए सामन्यांमध्ये 33.6 च्या सरासरीने 1950 धावा केल्या आहेत. तर 67 टी-20 सामन्यांमध्ये 1116 धावांची नोंद आहे. त्याच वेळी, केएस भरतने आयपीएल, प्रथम श्रेणी, लिस्ट-ए आणि डोमेस्टिक टी20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 4, 297, 69 आणि 48 झेल घेतले आहेत.

पहिल्या कसोटीसाठी कसा आहे भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

हे देखील वाचा-

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola