Team India Playing 11 IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर (Border Gavaskar Trophy) ट्रॉफी मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवला जात आहे. दरम्यान भारतीय संघाचा विचार करता एक धक्कादायक निर्णय घेत, टीम इंडियाने जबरदस्त लयीत असणाऱ्या शुभमन गिलला (Shubhman Gill) प्लेईग-11 मध्ये संधी दिलेली नाही. त्याच्या जागी केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर आता भारतीय चाहते संताप व्यक्त करत आहेत.
सोशल मीडियावर शुभमन गिलसंबधी पोस्ट शेअर करून भारतीय क्रिकेट चाहते प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर टीका करत आहेत. चाहते असंही लिहित आहेत की, शुभमन गिल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे, तरीही संघ व्यवस्थापनाने केवळ T20 क्रिकेटमध्ये वर्चस्व असलेल्या केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांना स्थान दिलं आहे. चांगलं प्रदर्शन करणाऱ्यांना टीम इंडियात कधीच स्थान मिळत नाही, अशी टीकाही चाहते करत आहेत. तर याच प्रतिक्रियांमधील काही पोस्ट पाहू...
कसा आहे भारतीय संघ?
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
हे देखील वाचा-