Mitchell Starc IND vs AUS, 1st ODI : विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे. पहिला वनडे सामना शुक्रवारी, 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानात होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क पहिल्या वनडेतून बाहेर पडले आहेत. दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू पहिल्या वनडे सामन्याला मुकणार आहेत. कर्णधार पॅट कमिन्स याने याबाबतची माहिती दिली. स्टार्क पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही, त्यामुळे त्याला आराम दिला जाणार आहे. तर मॅक्सवेलही दुखापतग्रस्त आहे, असे पॅट कमिन्स याने सांगितलेय. पॅट कमिन्सने स्टीव्ह स्मिथबाबत अपडेटही दिली. कमिन्स म्हणाला, तो पूर्णपणे बरा असून उद्या खेळणार आहे. त्याच्या मनगटात समस्या होती. पण आता तो 100 टक्के ठीक आहे.
भारताविरोधात वनडे मालिकेला सुरुवात होण्याच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने ऑस्ट्रेलिया संघाबद्दल माहिती दिली. कमिन्स म्हणाला की, मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मनगटाची दुखापत पूर्णपणे बरी झाली आहे. मला वाटते की मी तिन्ही सामने खेळेन. स्टार्क उद्या खेळणार नाही. आशा आहे की तो पुढील सामन्यांमध्ये भाग घेईल. तीच गोष्ट मॅक्सवेलचीही आहे. विश्वचषकापूर्वी संघाचा समतोल साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
स्टार्क ऑस्ट्रेलिया संघाचा महत्वाचा सदस्य आहे. स्टार्क याने ११० वनडे सामन्यात २१९ विकेट घेतल्या आहे. 28 धावा देऊन सहा विकेट ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. त्याने 82 कसोटी सामन्यात 333 विकेट घेतल्या आहेत. स्टार्कने एका कसोटी सामन्यात ९४ धावांच्या मोबदल्यात ११ विकेट घेतल्या आहेत. स्टार्कने 58 टी20 सामन्यात 73 विकेट घेतल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड, काय स्थिती -
वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 146 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 54 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर ६७ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 30 वेळा पराभव केला आहे.
टीम इंडिया -
केएल राहुल (कर्णधार, विकेकटकीपर), रविंद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया टीम:
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.