- आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा राहुल आवारे भारतीय संघात
- ईशांतने इन्स्टाग्रामवर लिहिलं, 'you only live once', विराट कोहलीने केलं ट्रोल
Ind vs Aus | ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 256 धावांचं लक्ष्य
एबीपी माझा वेब टीम | 14 Jan 2020 06:02 PM (IST)
पहिल्या वन-डे सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला संघासमोर 256 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
मुंबई : नवीन वर्षात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर 256 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज गडगडताना दिसले. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने 74, तर लोकेश राहुलने 47 धावांची खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 10 धावा काढून माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. संयमी खेळ करत शिखर धवनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, लोकेश राहुल 47 धावांवरच बाद झाला. यानंतर भारतीय फलंदाजांनी निराशाजनक खेळी केली. तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने 255 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 3, पॅट कमिन्स आणि रिचर्डसनने 2 तर झॅम्पा-आगरने 1-1 गडी बाद केला. 11 महिन्यांनतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात - ऑस्ट्रेलियाचा संघ सुमारे 11 महिन्यांनंतर पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी भारतात एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आला आहे. या हायव्होल्टेज मालिकेत तीनच सामने आहेत. पण मालिका रोमांचक होईल यात शंका नाही. दोन तगड्या संघांमधल्या या लढतीत ज्याचे गोलंदाज दमदार कामगिरी करती, त्यांच्याकडे मालिका झुकेल. त्यामुळे मागील मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. तर या मालिकेतही वर्चस्व कायम ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. संघातील 11 खेळाडू - भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), लोकेश राहुल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर. ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिन्च (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, अॅस्टन अगर, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, जोश हेजलवूड, मार्नस लाबुशॅन, केन रिचर्डसन, डी आर्की शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, अॅस्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा. संबंधित बातम्या -