मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि कर्णधार विराट कोहली सध्या चर्चेत आहेत. दरम्यान, विराट कोहलीने इशांत शर्माला त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवरुन ट्रोल केलं आहे. हे प्रकरण प्रचंड व्हायरल होत आहे. ईशांत आणि कोहली आता न्यूझिलंड दौऱ्यावर कसोटी सामन्यांमध्ये एकत्र खेळताना दिसणार आहेत. न्यूझिलंडच्या दौऱ्यावर भारतीय संघ आपला पहिला कसोटी सामना 21 ते 25 फेब्रुवारीपर्यंत वेलिंग्टनमध्ये आणि दुसरा कसोटी सामना 29 फेब्रुवारीपासून 4 मार्चपर्यंत क्राइस्टचर्चमध्ये खेळणार आहे.
ईशांत शर्माची इन्स्टाग्राम पोस्ट
ईशांतने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे की, 'आपण फक्त एकदाच जगतो.' ईशांतने आपल्या या पोस्टमुळेच इन्स्टाग्रामवर ट्रोल झाला आहे. ईशांतला विरोटने या पोस्टवरून ट्रोल केलं आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनीही ईशांतवर निशाणा साधला आहे.
विराटने केली ही कमेंट
विराट कोहलीने ईशांतच्या फोटोवर कमेंट करत लिहिलं की, 'ईशांत शर्मा, आम्हाल तर हे माहितचं नव्हतं.'
दरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यातल्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत भारताचा ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठीचा संघ निवडण्यात आला. या मालिकेत उभय संघांमध्ये 5 ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळवण्यात येणार आहेत. 24 जानेवारीला मालिकेतला पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवण्यात येईल.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर
संबंधित बातम्या :