मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला पहिला वन डे आंतरराष्ट्रीय सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. यंदाच्या मोसमात ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक हे टीम इंडियसमोरचं मुख्य लक्ष्य आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेनिमित्ताने भारतीय संघाला आपले कच्चे दुवे दूर करण्याची संधी मिळणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
मागील वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांसारख्या तगड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीतही विजय मिळवला होता. पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असतानाही, ऑस्ट्रेलियाने 3-2 अशी मालिका जिंकली होती. विराट कोहलीसाठी हा जोरदार झटका होता. कारण त्याच्या नेतृत्त्वात भारतीय संघ पहिल्यांदा मायदेशात एखादी एकदिवसीय मालिकेत पराभूत झाला होता. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचं पारडंही जड होतं.
11 महिन्यांनतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात
ऑस्ट्रेलियाचा संघ सुमारे 11 महिन्यांनंतर पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी भारतात एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आला आहे. या हायव्होल्टेज मालिकेत तीनच सामने आहेत पण मालिका रोमांचक होईल यात शंका नाही. दोन तगड्या संघांमधल्या या लढतीत ज्याचे गोलंदाज दमदार कामगिरी करती, त्यांच्याकडे मालिका झुकेल. त्यामुळे मागील मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. तर या मालिकेतही वर्चस्व कायम ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.
संभाव्य संघ-
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), लोकेश राहुल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.
ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिन्च (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, अॅस्टन अगर, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, जोश हेजलवूड, मार्नस लाबुशॅन, केन रिचर्डसन, डी आर्की शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, अॅस्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा.
IND vs AUS 1st ODI | ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्षातील पहिल्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jan 2020 09:00 AM (IST)
ऑस्ट्रेलियाचा संघ सुमारे 11 महिन्यांनंतर पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी भारतात एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आला आहे. या हायव्होल्टेज मालिकेत तीनच सामने आहेत पण मालिका रोमांचक होईल यात शंका नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -