IND vs AFG, Live Score Update : भारतानं सुवर्ण पदकावर कोरलं नाव, अफगाणिस्तानचं रौप्यपदकावर समाधान

India vs Afghanistan, Asian Games 2023 Final Live Score Update : आज आशियाई स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान संघ सुवर्णपदकासाठी आमने-सामने येणार आहेत.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 07 Oct 2023 02:57 PM
IND vs AFG, Live Score Update : भारतीय क्रिकेट संघाला सुवर्ण पदक

India vs Afghanistan Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत पुरुष क्रिकेट संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.



 


IND vs AFG, Live Score Update : पावसामुळा सामना रद्द

पावसामुळा सामना रद्द

IND vs AFG, Live Score Update : अफगाणिस्तानने 5 षटकात 16 धावा केल्या

सुवर्णपदकाच्या लढतीत अफगाणिस्तानने 3 गडी गमावून 16 धावा केल्या. अफगाणिस्तानने 5 षटके खेळली आहेत. वॉशिंग्टन सुंदरने एका षटकात 3 धावा दिल्या आहेत. साई किशोरनेही एका षटकात 3 धावा दिल्या आहेत.

पहिल्याच षटकात अफगाणिस्तानला पहिला धक्का

पहिल्याच षटकात अफगाणिस्तानला पहिला धक्का

अफगाणिस्तानची फलंदाजी सामन्याला सुरुवात

अफगाणिस्तानची फलंदाजी सामन्याला सुरुवात

India vs Afghanistan Live Score : 11.50 वाजता सामन्याला सुरुवात होईल

India vs Afghanistan Live Score : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला 11.50 वाजता सुरुवात होईल.

India vs Afghanistan Live Score : भारत-अफगाणिस्तान सामन्यावर पावसाचं सावट

आजच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. आशियाई खेळांच्या नियमांनुसार, पावसामुळे सामना रद्द झाला, तर उच्च रँकिंग संघाला विजेता घोषित केलं जाईल. अशा परिस्थितीत भारतीय संघाला चांगली संधी आहे. भारतीय संघ क्रमवारीत अफगाणिस्तानच्या पुढे आहे. त्यामुळे पावसामुळे आजचा सामना झाला नाही तर भारताला सुवर्ण तर अफगाणिस्तानला रौप्यपदक मिळेल. 

India vs Afghanistan Live Score : पावसामुळे नाणेफेक उशिराने

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष क्रिकेटच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे. पावसामुळे नाणेफेक उशिराने होणार आहे.

India vs Afghanistan Live Score : अफगाणिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन

नूर अली जद्रान, मोहम्मद शहजाद, अफसर झझाई, सेदीकुल्लाह अटल, कैस अहमद, फरीद अहमद, झहीर खान, शराफुद्दीन अश्रफ, गुलबदिन नायब, करीम जनात आणि शहिदुल्ला कमाल.

India vs Afghanistan Live Score : टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, साई किशोर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद.

India vs Afghanistan Live Score : चीनच्या मैदानावर अंतिम सामन्याचा थरार

भारत आणि आफगाणिस्तान यांच्यात आज सुवर्णपदकासाठीचा सामना रंगणार आहे. आशियाई खेळ 2023 मधील क्रिकेटचा अंतिम सामना आज टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात चीनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. 

India vs Afghanistan Live Score : चीनच्या मैदानावर अंतिम सामन्याचा थरार

भारत आणि आफगाणिस्तान यांच्यात आज सुवर्णपदकासाठीचा सामना रंगणार आहे. आशियाई खेळ 2023 मधील क्रिकेटचा अंतिम सामना आज टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात चीनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. 

India vs Afghanistan Live Score : बांगलादेशनं पाकिस्तानचा पराभव करत जिंकलं कांस्यपदक

आशियाई स्पर्धा 2023 मध्ये बांगलादेशने पाकिस्तानचा सहा विकेट्सने (DLS) पराभव करून कांस्यपदक जिंकलं.

India vs Afghanistan Live Score : थोड्याच वेळात नाणेफेक

India vs Afghanistan Live Score : थोड्याच वेळात नाणेफेक

Asian Games 2023 : सुवर्णपदकासाठी आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान लढत?

IND vs AFG, Asian Games 2023 Final : आशियाई खेळ 2023 मध्ये क्रिकेट स्पर्धेत भारताने बांगलादेशचा पराभव करत तर, अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.



 


पार्श्वभूमी

IND vs AFG Live Score, Asian Games 2023 Final : आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2023) यंदा भारताने इतिहास (Team India) रचला आहे. यंदा आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताने 100 पदकांचा आकडा पार केला आहे. आता सर्वांच्या नजरा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडे लागल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. आशियाई स्पर्धेत आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना पाहायला रंगणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील अंतिम सामना आज 11.30 वाजता खेळवला जाणार आहे. त्यामुळे सुवर्णपदक कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 


सुवर्ण पदकासाठी भारत-अफगाणिस्तान आमने-सामने


दरम्यान, आजच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. आशियाई खेळांच्या नियमांनुसार, पावसामुळे सामना रद्द झाला, तर उच्च रँकिंग संघाला विजेता घोषित केलं जाईल. अशा परिस्थितीत भारतीय संघाला चांगली संधी आहे. भारतीय संघ क्रमवारीत अफगाणिस्तानच्या पुढे आहे. त्यामुळे पावसामुळे आजचा सामना झाला नाही तर भारताला सुवर्ण तर अफगाणिस्तानला रौप्यपदक मिळेल. भारतीय महिला क्रिकेट संघाने यापूर्वीच सुवर्णपदक जिंकलं आहे. आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाचीही सुवर्ण पदकावर नजर आहे.


टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान


आशियाई खेळ 2023 मध्ये क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्या अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. भारताने (Team India) उपांत्य फेरीत बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला तर, अफगाणिस्तान (Afghanistan) ने उपांत्य फेरीत पाकिस्तान (Pakistan) चा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि आफगाणिस्तान यांच्यात आज सुवर्णपदकासाठीचा सामना रंगणार आहे. आशियाई खेळ 2023 मधील क्रिकेटचा अंतिम सामना आज टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात चीनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हांगझाऊ येथील झेजियांग युनिव्हर्सिटीऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट स्टेडिअमवर रंगणार आहे. सकाळी 11.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. आजच्या अंतिम सामन्यातील संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात रात्री 11 वाजता नाणेफेक होणार आहे. त्याचवेळी सकाळी 11.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.