IND vs AFG, Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेत (Asian Games 2023) पुरुष क्रिकेट संघानं (Team India) सुवर्णपदक (Gold Medal) जिंकलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातील सुवर्णपदकाचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने सुवर्णपदक पटकावलं आहे. आशियाई स्पर्धा 2023 मधील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना हांगझोऊमध्ये सुरु होता. मात्र, सामन्यात अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना मधेच थांबवावा लागला. हांगझोऊमध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुन्हा सामना सुरु असण्याची शक्यता फार कमी असल्याने पॉईंट्स टेबलनुसार, भारताला सुवर्णपदक जाहीर करण्यात आलं आहे.
पुरुष क्रिकेट संघानं सुवर्णपदक
आशियाई स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारताने पॉईंट्स टेबलवरी उच्च रँकिंगमुळे सुवर्णपदक जिंकलं आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धांबाबत हा क्लीन स्वीप आहे. दरम्यान, अफगाणिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. आजच्या सामन्यावर पावसाचं सावट होतं. आशियाई खेळांच्या नियमांनुसार, पावसामुळे सामना रद्द झाला, तर उच्च रँकिंग संघाला विजेता घोषित केलं जातं. या नियमानुसार, भारतीय संघ क्रमवारीत अफगाणिस्तानच्या पुढे असल्यामुळे भारताला सुवर्णपदक जाहीर करण्यात आलं आहे.
सात्विक-चिराग जोडीला बॅडमिंटमध्ये 'गोल्ड'
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. सात्विक-चिरागच्या जोडीने बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरलं.
भारताच्या आतापर्यंत 28 सुवर्णपदकांसह 103 पदकं
भारताने यंदा आशियाई खेळांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 72 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताने आशियाई खेळांमध्ये 100 चा आकडा पार केला आहे. आतापर्यंत आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताच्या खात्यात 28 सुवर्णपदकं जमा झाली आहेत. यासोबतच भारताने यंदा 103 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 28 सुवर्णपदकं, 35 रौप्यपदकं, 40 कांस्यपदकांचा समावेश आहे.