India Tour of South Africa Complete Schedule: डिसेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघ तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची कसोटी मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि चार सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने या भारत दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.


1991 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पुनरागमनानंतर 30व्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार्‍या भारताचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी सांगितले. भारताने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.


17 डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे
दोन्ही देशांदरम्यान खेळवली जाणारी ही तीन सामन्यांची कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, दुसरी कसोटी 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे. यानंतर मालिकेतील अंतिम आणि तिसरी कसोटी 03 ते 07 जानेवारी 2022 या कालावधीत खेळवली जाईल. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.


हे आहे एकदिवसीय आणि टी-20 मालिकेचे वेळापत्रक


एकदिवसीय मालिका-
पहिली वनडे - 11 जानेवारी (बोलंड पार्क)
दुसरी एकदिवसीय - 14 जानेवारी (केपटाऊन)
तिसरी एकदिवसीय - 16 जानेवारी (केपटाऊन)


टी-20 मालिका
पहिली T20 - जानेवारी 19 (केपटाऊन)
दुसरी T20 - 21 जानेवारी (केपटाऊन)
तिसरा T20 - 23 जानेवारी (बोलंड पार्क)
चौथी T20 - 26 जानेवारी (बोलंड पार्क)


भारताचा न्यूझीलंड दौरा
न्यूझीलंड संघाला भारत दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 17 नोव्हेंबरला जयपूरमध्ये खेळवला जाणार आहे. त्याचवेळी दुसरा टी-20 सामना रांचीमध्ये 19 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यात स्टेडियममध्ये प्रेक्षकांची एन्ट्री होणार आहे. राज्य सरकारने 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 21 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. यानंतर पहिली कसोटी कानपूरमध्ये तर दुसरी कसोटी मुंबईत खेळवली जाईल.