IND vs SCO: T20 विश्वचषकाच्या सुपर 12 सामन्यात आज भारत आणि स्कॉटलंड आमनेसामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून होणारा हा सामना भारतासाठी जिंकणे आवश्यक आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आता सर्व सामने जिंकावे लागतील. या सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, खेळपट्टी कशी असेल. सविस्तर जाणून घेऊया.


गेल्या सामन्यात भारताचे शानदार पुनरागमन
पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन केले. संघाने हा सामना 66 धावांनी जिंकून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. दुसरीकडे, स्कॉटलंडबद्दल बोलायचे तर ते सुपर 12 मध्ये आतापर्यंतचे सर्व सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत तळाशी आहे.


खेळपट्टी आणि हवामान रिपोर्ट
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी आज गोलंदाजांना विशेषतः पहिल्या डावात मदत करू शकते. सुरुवातीला गोलंदाजांना खेळपट्टीवरून स्विंग मिळेल. अशा स्थितीत या सामन्यात नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करणे पसंत करेल. या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तेथील हवामानाबद्दल बोलायचे तर हवामान सामान्य असेल. इथे पावसाची शक्यता नाही.


भारताची प्लेइंग 11 काय असू शकते?
गेल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत, संघ आपल्या प्लेइंग 11 मध्ये क्वचितच बदल करण्याची शक्यता आहे. भारताचा संघ असाच राहू शकतो.
के.एल. राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, आर.के. अश्विन.


स्कॉटलंड प्लेइंग 11 
जॉर्ज मुंसी, काइल कोएत्झर (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), कॅलम मॅक्लिओड, रिची बेरिंग्टन, मायकेल लिस्क, ख्रिस ग्रीव्ह्स, अलास्डेयर इव्हान्स/जोश डेव्ही, सफायान शरीफ, मार्क वॉट, ब्रॅड व्हील.


कुणाचं पारडं जड?
या सामन्यासाठी टीम इंडिया फेव्हरिट आहे. गेल्या सामन्यात संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यामुळे स्कॉटलंडचा रस्ता कठीण दिसत आहे. त्याचबरोबर स्कॉटलंडची आतापर्यंतची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. संघाने गोलंदाजी किंवा फलंदाजीमध्ये प्रभाव पाडलेला नाही. त्याचबरोबर टीम इंडियाला पंतकडून मोठ्या आशा आहेत.


हा सामना कुठे पाहू शकता?
हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर तसेच Disney+ Hotstar वर टीव्हीवर पाहू शकता.