India vs Bangladesh : भारतीय संघ (Team India) सध्या विविध देशांच्या दौऱ्यावर असून न्यूझीलंड दौऱ्यानंतर आता बांगलादेशच्या (India tour of Bangladesh) दौऱ्यावर टीम इंडिया जात आहे. या दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसह दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. उद्या म्हणजेच रविवारपासून (4 डिसेंबरपासून) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे आणि 14 ते 26 डिसेंबरदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. तर सर्वात आधी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊ...
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये म्हणजेच काही महिन्यांत भारतीय भूमीत पार पडणार आहे. 2011 नंतर पुन्हा एकदा भारताला यजमानपद मिळालं असून यंदा भारत पुन्हा एकदा विश्वचषक उंचावण्यासाठी सर्व प्रयत्न करणार हे नक्की! त्या दृष्टीने आता अधिक एकदिवसीय सामने भारत खेळत असून न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेने भारताने याची सुरुवात केली. या मालिकेत दोन सामने अनिर्णीत राहिले असून एक सामना न्यूझीलंडने जिंकला. ज्यानंतर आता भारत बांगलादेश दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे...
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 4 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
दुसरा एकदिवसीय सामना | 7 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
तिसरा एकदिवसीय सामना | 10 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
बांगलादेश एकदिवसीय संघ:
लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान. , आणि तस्किन अहमद
कधी, कुठे पाहू शकता सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 14 ते 18 डिसेंबर | झहूर अहमद चौधरी स्टेडियम |
दुसरा कसोटी सामना | 22 ते 26 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.