India vs England T20 World Cup Semi-final : 10 नोव्हेंबर 2022 रोजी ऐडिलेडच्या मैदानात इंग्लंडने भारताच्या विश्वचषक विजयाच्या स्वप्नावर पाणी फेरले होते. उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा दहा विकेटने दारुण पराभव केला होता. आता 16 महिन्यानंतर टीम इंडियाकडे याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी आली आहे. रोहित शर्मा अॅण्ड कंपनीने ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवला. आता गुरुवारी इंग्लंडविरोधातही विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार, यात शंकाच नाही. गयानाच्या मैदानात संध्याकाळी आठ वाजता उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंडचा सामना होणार आहे. 2022 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. 


2022 टी20 वर्ल्डकपमध्ये काय झालं ?


इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 विकेटच्या मोबदल्यात 168 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने 33 चेंडूमध्ये पाच षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने 63 धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्याशइवाय विराट कोहलीने 40 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि चार चौकार ठोकला.  रोहित शर्मा याने 28 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली होती. सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अदिल रशिद याने 4 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतल्या. 


इंग्लंडने दिलेल्या 169 धावांचे आव्हान इंग्लंडने 24 चेंडू आणि दहा विकेट राखून सहज पार केले. कर्णधार जोस बटलर याने 49 चेंडूमध्ये 80 तर अॅलेक्स हेल्स याने 47 चेंडूमध्ये 86 धावांचा पाऊस पाडला होता. भारताच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नव्हती. भुवनेश्वर कुमार, अर्शधीप सिंह, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, आर. अश्विन आणि हार्दिक पांड्या यांना विकेट मिळवता आली नव्हती. 


टीम इंडिया पराभवाचा हिशेब चुकता काढणा का? 


2022 मधील याच दारुण पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ लयीत आहे. विराट कोहलीसारखा फलंदाज फ्लॉप जात असतानाही भारतीय संघाने लौकिकास साजेशी कामगिरी केली आहे. गुरुवारी इंग्लंडचा पराभव करत 16 महिन्यानंतर भारतीय संघ बदल घेत फायनलमध्ये धडक मारेल, अशी चाहत्यांना इच्छा आहे.


2024 टी20 विश्वचषकात परस्परविरोधी दोन्ही संघ - 


भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज  


इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जोर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, रीस टॉपले आणि  मार्क वूड