Ind vs Nz 3rd Test Playing 11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी शेवटची कसोटी मुंबईत खेळवली जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो. रोहित शर्माच्या संघाने मालिका गमावली असली तरी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी इथून प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. सलग दोन सामने जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. तथापि, रोहित शर्मा आणि कंपनी देखील पलटवार करण्याच्या तयारीत आहेत.


हर्षित राणा करणार मुंबई कसोटीत पदार्पण?


हर्षित राणा आयपीएल 2024 मधील चमकदार कामगिरीनंतर निवडकर्त्यांची निवड झाली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅम्पमध्ये असताना हर्षितला जवळून पाहिले आहे. अशा स्थितीत हर्षित राणाला न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षितला खेळवले जाऊ शकते अशा बातम्याही आल्या आहेत.


बुमराहला तिसऱ्या कसोटीत मिळणार विश्रांती?


न्यूझीलंड मालिकेनंतर भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ कांगारूंविरुद्ध 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जसप्रीत बुमराह या मालिकेत मुख्य गोलंदाज असणार आहे आणि याचा विचार करून संघ व्यवस्थापन त्याला मुंबई कसोटीत विश्रांती देण्याचा विचार करू शकते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा खेळू शकतो.


हर्षित राणाची कारकीर्द


देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या हर्षित राणाने कमी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे. त्याने आतापर्यंत 10 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 24.00 च्या सरासरीने 43 बळी घेतले आहेत. अलीकडेच आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करत 7 बळी घेतले. हर्षित राणाने चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावले.


ही असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन -


रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.


हे ही वाचा -


Ind vs Pak : दिवाळीत पडणार चौकार, षटकारांचा पाऊस! 1 नोव्हेंबरला भिडणार भारत-पाकिस्तान, केव्हा, कधी अन् कुठे पाहू शकता Live सामना?