Gautam Gambhir all time Indian ODI XI: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने नुकताच भारताचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. गौतम गंभीरने निवडलेल्या या संघात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला स्थान दिलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
गौतम गंभीरने (Gautam Gambhir) जाहीर केलेल्या एकदिवसीय संघातून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) वगळण्यात आले आहे. सलामीवीर म्हणून गौतम गंभीरने विरेंद्र सेहवागला निवडले आहे. तर स्वत:ला सलामीवीर म्हणून निवडले आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविडला स्थान देण्यात आले आहे. तर चौथ्या स्थानावर सचिन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे.
पाचव्या स्थानावर विराट कोहलीला गौतम गंभीरने निवडले आहे. तर अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहला सहाव्या क्रमांवार गौतम गंभीरने स्थान दिले आहे. यष्टीरक्षक म्हणून एमएस धोनीला संधी देण्यात आली आहे. तर गोलंदाजीत अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, इरफान पठाण आणि झहीर खानला सर्वोत्तम एकदिवसीय संघात निवडले आहे. विशेष म्हणजे गौतम गंभीरने कर्णधार म्हणून कोणाला निवडले नाही.
गौतम गंभीरने निवडलेला सर्वोत्तम एकदिवसीय संघ:
गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), अनिल कुंबळे, आर अश्विन, इरफान पठाण आणि झहीर खान.
Gautam Gambhir's all time Indian ODI XI (Sportskeeda):
Gambhir, Sehwag, Dravid, Tendulkar, Kohli, Yuvraj, Dhoni, Kumble, Ashwin, Irfan and Zaheer.
गौतम गंभीर काय म्हणाला?
स्पोर्ट्स कीडाने गौतम गंभीरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये गौतम गंभीरला जेव्हा भारतीय संघाचा एकदिवसीय सर्वोत्तम संघ निवडण्यास सांगितले तेव्हा त्याने वीरेंद्र सेहवागसह स्वतःला सलामीवीर म्हणून निवडले आणि रोहित शर्माला बाहेर ठेवले. अकरा जणांची निवड करताना गंभीर म्हणाला, सेहवाग आणि मी सलामीवीर म्हणून संघात असू. राहुल द्रविड, चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर, पाचव्या स्थानावर विराट कोहली. युवराज सिंग सहाव्या, महेंद्रसिंग धोनी सातव्या, अनिल कुंबळे आठव्या, आर अश्विन नवव्या स्थानावर आहे, मला इरफान पठाण दहाव्या स्थानावर ठेवायचे आहे आणि झहीर खान शेवटच्या स्थानावर असेल, असं गौतम गंभीर म्हणाला.
संबंधित बातमी:
प्रीती पालने रचला इतिहास; पॅरालिम्पिकमध्ये पटकावले दोन कांस्य पदक, निषादचीही रौप्य कामगिरी