Paris Paralympics 2024 India: सध्या पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक 2024 ची (Paris Paralympics 2024) स्पर्धा सुरु आहे. रविवारी भारताला दोन पदके मिळाली. धावपटू प्रीती पाल (Preethi Pal) हिने पॅरिस ऑलिम्पिकमधील दुसरे पदक पटकावले. या पदकासह भारताने आतापर्यंत सात पदके जिंकली आहेत. 


पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympics 2024) महिला गटातील 200 मीटर टी 35 अंतिम फेरीत 31.01 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रीती पालने तिसऱ्या क्रमांकासह कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. याआधी प्रीतीने महिलांच्या 100 मीटर टी 35 प्रकारातही कांस्य पदक जिंकले होते. अॅथलेटिक्समधील ट्रॅक प्रकारात पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी प्रीती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तर आता एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याचा महापराक्रम देखील प्रीतीने करुन दाखवला आहे.  






निशाद कुमारने जिंकले रौप्य पदक-


उंच उडीच्या स्पर्धेत निशाद कुमारने (Nishad Kumar) रौप्य पदक जिंकले. निशादने पुरुषांच्या उंच उडी टी 47 प्रकारात हे रौप्य पदक जिंकले. निशादने 2.04 मीटर उंच उडी मारत पदक पटकावले. अमेरिकेचा रोडरिक टाऊनसेंडने सुवर्णपदक आमि जॉर्जी मार्गिवने कांस्य पदक जिंकले. 






पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेत्यांची नावे-


1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
2.मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
3.प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
5. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)


संबंधित बातमी:


Paralympics Rubina Francis : 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये रुबिनाचा एकदम कडक निशाणा! जिंकले कांस्यपदक, भारताच्या खात्यात पाचवे पदक