IND vs NEWZ World cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे बिगुल वाजणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिला सामना होत आहे. उपविजेत्या न्यूझीलंडला मागील 20 वर्षांत वर्ल्ड कपमध्ये भारताला एकदाही पराभूत करता आले नाही. न्यूझीलंडने भारताला प्रत्येक आयसीसी स्पर्धेत पराभव केले आहे. मग  2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन असा किंवा इतर कोणताही सामना... न्यूझीलंडविरोधात विश्वचषकात भारताची कागिरी खराबच राहिली आहे. 






भारतीय संघाने विश्वचषकात न्यूझीलंडला अखेरचं 2003 मध्ये पराभूत केले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विश्वचषकात न्यूझीलंडला हरवलं होते. तेव्हा विराट कोहली 14 वर्षांचा होता, तर रोहित शर्मा 16 वर्षांचा होता. गौतम गंभीर आणि एमएस धोनीने तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले नव्हते. भारताने न्यूझीलंडला पराभूत करुन 20 वर्षांचा काळ ओलांडला आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ न्यूझींलडला हरवणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे. 






यंदाचा विश्वचषक राउंड रॉबिन पद्धतीने होत आहे. 10 संघांना प्रत्येक संघाविरोधात सामना खेळायचा आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 22 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया यंदा तरी न्यूझीलंडला हरवणार का? हे 22 ऑक्टोबर रोजी समजणार आहे. 


विश्वचषकात सहभागी असणाऱ्या संघाविरोधात भारताची कामगिरी कशी ?


पाकिस्तान (Pakistan) : 7-0.
श्रीलंका Sri Lanka: 4-4.
ऑस्ट्रेलिया Australia: 4-8.
बांगलादेश Bangladesh: 3-1.
इंग्लंड England: 3-4.
न्यूझीलंड New Zealand: 3-5.
नेदर्लंड्सNetherlands: 2-0.
दक्षिण आफ्रिका South Africa: 2-3.
आफगाणिस्तान Afghanistan: 1-0.



वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचे वेळापत्रक -



8 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई


11 ऑक्टोबर: भारत विरुद्ध अफगानिस्तान, दिल्ली


14 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद


19 ऑक्टोबर: भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे


22 ऑक्टोबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला


29 ऑक्टोबर: भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ


2 नोव्हेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई


5 नोव्हेंबर: भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका, कोलकाता


12 नोव्हेंबर: भारत विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरु