IND vs SA T20I : गुवाहाटी येथे झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने 16 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने तीन सामन्याच्या टी 20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. गुवाहाटीच्या मैदानातील हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरलाय. कारण, मायदेशात भारताला टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकाला एकदाही पराभूत करता आलेलं नव्हतं. मायदेशात टी 20 मालिकेत भारताने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताने दिलेल्या 238 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने 221 धावांपर्यंत मजल मारली. टी 20 क्रिकेटमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा मायदेशात पहिल्यांदाच पराभव केलाय. यासह मायदेशात भारताने सलग 11 मालिका जिंकण्याचा पराक्रमही केलाय.
मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात टी 20 मध्ये भारताची कामगिरीत लौकिकास साजेशी नव्हती. पण यंदा भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत कामगिरीत सुधारणा केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका मायेदशात याआधी तीन वेळा आमनेसामने आले होते. यामध्ये दक्षिण आफ्रिकाने एक मालिका जिंकली होती. तर दोन मालिका बरोबरीत सुटल्या होत्या. 2015 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये पहिली टी 20 मालिका झाली होती. त्यावेळी आफ्रिकाने भारताचा 2-0 ने पराभव केला होता. त्यानंतर 2019 आणि 2022 मध्ये झालेल्या मालिका 1-1 आणि 2-2 बरोबरीत सुटल्या होत्या. 2022 मध्येच झालेल्या दुसऱ्या टी 20 मालिकेत भारताने हिशोब चुकता केला. भारताने तीन सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आठ टी 20 मालिका झाल्या आहेत. यामध्ये भारताने सर्वाधिक चार मालिका जिंकल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिाकने दोन मालिकेत बाजी मारली आहे. तर दोन मालिका बरोबरीत सुटल्या आहेत.
सामन्यात काय झालं?
गुवाहटी येथे झालेल्या दुसरा टी20 मध्ये भारताने 16 धावांनी विजय नोंदवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 237 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी तुफानी फलंदाजी केली. प्रत्युत्तर दाखल दक्षिण आफ्रिका संघाने 20 षटकात 221 धावांपर्यंत मजल मारली. डेविड मिलरचं वादळी शतक आणि डि कॉकची अर्थशतकी खेळी व्यर्थ ठरली. गुवाहटी येथे झालेल्या दुसरा टी20 मध्ये भारताने 16 धावांनी विजय नोंदवला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 237 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी तुफानी फलंदाजी केली. प्रत्युत्तर दाखल दक्षिण आफ्रिका संघाने 20 षटकात 221 धावांपर्यंत मजल मारली. डेविड मिलरचं वादळी शतक आणि डि कॉकची अर्थशतकी खेळी व्यर्थ ठरली.