India vs England 5th Test : धर्मशाला कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ फिरकीच्या जाळ्यात अडकला आहे. कुलदीप यादव आणि आर.अश्विन यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ फक्त 218 धावांत गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या, तर 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने चार फलंदाजांची शिकार केली. रवींद्र जाडेजाला एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून दिग्गज फलंदाज अपयशी ठरले.  सलामी फलंदाज जॅक क्रॉऊली यानं फक्त भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. जॅक क्राऊली यानं 79 धावांची खेळी केली. जॅकचा अपवाद वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. 


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात संयमी झाली, पण कुलदीप यादव यानं भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. बेन डकेट आणि जॅक क्राऊली यांनी 64 धावांची सलामी दिली. ही जोडी धोकादायक ठरते की काय असं वाटत होतं. पण कुलदीप यादवनं  18 व्या षटकात बेन डकेट याचा अडथळा दूर केला. बेन डकेट याचा शुभमन गिल यानं अप्रतिम झेल घेतला. डकेट बाद झाल्यानंतर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. 


इंग्लंडच्या फलंदाजांनी ये रे माझ्या मागल्या प्रमाणे विकेट फेकल्या. जॅक क्राऊली यानं आपलं काम चोख बजावलं. जॅक क्राऊली यानं 108 चेंडूमध्ये 79 धावांची खेळी केली. यामध्ये 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. जॅक क्राऊलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. तीन फलंदाज खातेही उघडू शकले नाही. यामध्ये कर्णधार बेन स्टोक्स याचाही समावेस आहे. 


भारताच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचा संघ अडकला. चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. इंग्लंडचे आठ फलंदाज 200 धावांच्या आत गमावले.  भारताकडून कुलदीप यादवने पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. तर आर. अश्विन यानं चार विकेट घेतल्या तर जाडेजानं एका फलंदाजाला तंबूत पाठवलं. इंग्लंडकडून जॅक क्रॉली यानं संघर्ष केला. त्यानं 108 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी केली. त्याशिवाय बेन डकेट 27, ओली पॉप 11, जो रुट 26, जॉनी बेअरस्टो 29 , बेन स्टोक्स आणि टॉप हार्ट्ले यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.


कुलदीप यादवने 15 षटकात 72 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. तर रवींद्र जाडेजानं 10  षटकात 17धावा खर्च करत एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनीही भेदक मारा केला. त्यांना विकेट मिळवण्यात अद्याप अपयश आलेय. आर. अश्विन यानं 11.4 षटकात 51 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या.