LLC 2022 : लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket 2022) आज (16 सप्टेंबर) कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) एका खास सामन्याच आयोजन केलं गेलं आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स (India Maharajas vs World Giants) यांच्यात आज महामुकाबला होणार असून यावेळी भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर मैदानात असतील. त्यांच्या समोर जागतिक क्रिकेटमधील माजी दिग्गज क्रिकेटर उतरणार आहेत. यावेळी हरभजन सिंहच्या (Harbhajan SIngh) नेतृत्त्वाखाली इंडिया महाराजा संघ मैदानात उतरला आहे. तर वर्ल्ड जायंट्सचा कर्णधार जॅक कॅलिस (Jacques Kallis) आहे.
यावेळी भारतीय संघाचा विचार करता वीरेन्द्र सेहवाग नाही तर हरभजन सिंह संघाचं नेतृत्त्व करत आहे. विशेष म्हणजे मॅच फिक्सिंग प्रकरणार नाव आल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकलेला एस श्रीसंथही आज मैदानात उतरताना दिसणार आहे. त्याच्या सोबतीला इरफान पठान, पंकज सिंह, जोगिंदर शर्मा हे गोलंदाज असतील. दुसरीकडे युसूफ पठान, मोहम्मद कैफ, पार्थिव पटेल मधल्या फळीत असतील. तर वीरेन्द्र सेहवाग, तन्मय श्रीवास्तव, मनविंदर बिस्ला फलंदाजीला असतील.
कसे आहेत दोन्ही संघ?
इंडिया महाराजा:
वीरेन्द्र सेहवाग, तन्मय श्रीवास्तव, मनविंदर बिस्ला, युसूफ पठान, मोहम्मद कैफ, पार्थिव पटेल (विकेटकीपर), इरफान पठान, हरभजन सिंह (कर्णधार), एस श्रीसंथ, पंकज सिंह, जोगिंदर शर्मा.
वर्ल्ड जायंट्स:
जॅक्स कॅलिस (कर्णधार), हेमिल्टन मसाकाद्जा, थिसारा परेरा, दिनेश रामदिन (विकेटकीपर), टीम ब्रेसनन, फिदेल एडवर्ड्स, माँटी पानेसर, तातेन्दा तायबू, केविन ओब्रायन, डेनियल विटोरी, मुथय्या मुरलीधरन
हे देखील वाचा-