India Cricket Schedule 2025-2027: भारतीय क्रिकेट संघासाठी 2024 हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले होते. टी-20 विश्वचषक विजय सोडला, तर अनेक मालिकांमध्ये भारताची कामगिरी सुमार ठरली. यामध्ये मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पत्करावा लागलेला व्हाइटवॉश भारतीयांच्या जिव्हारी लागला. आता 2024 ची कामगिरी मागे टाकून टीम इंडियाला 2025 मध्ये आणखी चांगली कामगिरी करायची आहे, ज्यासाठी संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने यावर्षी 15 सामने खेळले, त्यापैकी 8 जिंकले, 6 गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. 2024 मध्ये, भारतीय संघ फक्त तीन एकदिवसीय सामने खेळला आणि यामध्ये श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा यंदाचा टी-20 मधील रेकॉर्ड उत्कृष्ट होता कारण 26 सामन्यांत 22 सामन्यात विजय मिळवला, तर फक्त 2 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. आता 2025-2027 पर्यंत टीम इंडियाचे वेळापत्रक कसे असेल ते जाणून घ्या...


दोन मोठ्या स्पर्धांचे अंतिम सामने पाहायला मिळणार-


2025 मध्ये फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवली जाणार नाही. तर, यावर्षी आणखी दोन मोठ्या स्पर्धांचे अंतिम सामने पाहायला मिळणार आहेत. सर्वप्रथम, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना जून महिन्यात लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. यानंतर टी-20 आशिया कपही खेळवला जाणार आहे. जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे.


2025 मध्ये टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक:


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: जानेवारी 2025 (एक कसोटी)
भारत विरुद्ध इंग्लंड: जानेवारी-फेब्रुवारी 2025 (3 वनडे आणि 5 टी-20)
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी: फेब्रुवारी-मार्च 2025
IPL 2025: मार्च-मे 2025
भारत विरुद्ध इंग्लंड: जून-ऑगस्ट 2025 (5 कसोटी)
भारत विरुद्ध बांगलादेश: ऑगस्ट 2025 (3 वनडे आणि 3 टी-20)
आशिया कप: सप्टेंबर 2025
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: ऑक्टोबर (2 कसोटी)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 (3 वनडे आणि 5 टी-20)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: ऑक्टोबर-नोव्हेंबर (2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20)
भारत विरुद्ध न्यूझीलंड: जानेवारी-फेब्रुवारी 2026 (3 एकदिवसीय आणि 5 टी-20)
T20 विश्वचषक: फेब्रुवारी-मार्च 2026
आयपीएल 2026: मार्च-मे 2026
भारत विरुद्ध अफगाणिस्तान: जून 2026 (1 कसोटी आणि 3 वनडे)
भारत विरुद्ध इंग्लंड: जुलै 2026 (3 वनडे आणि 5 टी-20)
भारत विरुद्ध श्रीलंका: ऑगस्ट 2026 (2 कसोटी)
भारत विरुद्ध अफगाणिस्तान: सप्टेंबर 2026 (तिसरा टी-20)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: सप्टेंबर-ऑक्टोबर 2026 (3 वनडे आणि 5 टी-20)
भारत विरुद्ध न्यूझीलंड: ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 (2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20)
भारत विरुद्ध श्रीलंका: डिसेंबर 2026 (3 वनडे आणि 3 टी-20)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: जानेवारी 2027 (5 कसोटी)


संबंधित बातमी:


ट्रॅव्हिस हेडने हेल्मेट फेकला, चाहत्यांचं गांगुली स्टाईल सेलीब्रेशन; ऑस्ट्रेलियाने सामना जिंकताच मैदानात काय काय घडलं?, VIDEO