Ind vs Aus: भारत विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) 184 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 340 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारताला 155 धावाच करता आल्या. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 


ऑस्ट्रेलियाने विजयानंतर जोरदार सेलीब्रेशन केले. ट्रॅव्हिस हेडने हेल्मेट फेकत आनंद साजरा केला. तर मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी कपडे काढून हाताने फिरवत गांगुली स्टाईल सेलीब्रेशन केले. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे सर्वंच खेळाडू सेलीब्रेशन करताना दिसून आले. 






मालिका बरोबरीत सुटणार की ऑस्ट्रेलिया बाजी मारणार?


भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.  बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा शेवटचा सामना आता सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल, जो पुढील वर्षाचा पहिला सामना असेल. फायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल, अन्यथा ती फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.


मेलबर्नमध्ये खेळाडूंनी नाही तर चाहत्यांनी मोडला 87 वर्ष जुना रेकॉर्ड-


मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बॉक्सिंग डे कसोटी सामना पाहण्यासाठी एकूण प्रेक्षक संख्या 350,700 पेक्षा जास्त होती. आतापर्यंत या मैदानावर इतके प्रेक्षक कधीच आले नव्हते, जेवढे हा सामना पाहण्यासाठी आले आहेत. याआधी 1937 मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 350,534 प्रेक्षक आले होते. ऑस्ट्रेलियातही आतापर्यंत कोणताही कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. हा सामना पाहण्यासाठी पाचही दिवस आलेल्या चाहत्यांची संख्या पाहिली तर पहिल्या दिवशी 87,242 चाहते, दुसऱ्या दिवशी 85,147 चाहते, तिसऱ्या दिवशी 83,073 आणि चौथ्या दिवशी 43,867 आणि पाचव्या दिवशी या सामन्यासाठी स्टेडियममध्ये 51,371 हून अधिक चाहते उपस्थित होते.


संबंधित बातमी:


Ind vs Aus: एक, दोन, तीन...टीम इंडियाच्या 9 धावांत धडाधड विकेट्स, हेड्सने चिडवले, सगळ्यांचे चेहरे उतरले, VIDEO