ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup 2024) ची स्पर्धा आगामी 2 जूनपासून सुरु होणार आहे. यासाठी नुकतीच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषकाच्या या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. भारत आणि आयर्लंडचे संघ 5 जूनला आमनेसामने येणार आहेत. 


आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.  रोहित शर्मा टी-20 विश्वचषक स्पर्धेत नवव्यांदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहित शर्मा आयसीसीचे सर्व टी-20 विश्वचषक खेळला आहे. 


अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार-


2007 मध्ये पहिल्यांदा टी-20 विश्वचषक खेळला गेला. भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. रोहित शर्मा त्या भारतीय संघाचा भाग होता. यानंतर रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2009, टी-20 विश्वचषक 2010, टी-20 विश्वचषक 2012, टी-20 विश्वचषक 2014, टी-20 विश्वचषक 2021 आणि टी-20 विश्वचषक 2022 मध्ये खेळवला गेला. अशाप्रकारे रोहित शर्मा टी-20 विश्वचषकाच्या 8 हंगामाचा भाग आहे. तथापि, रोहित शर्मासाठी 2024 चा टी-20 विश्वचषक नववा टी-20 विश्वचषक असेल.


रोहित शर्मा T-20 विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार...


नुकतेच मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, तर हार्दिक पांड्या उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे. भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्ध विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. यानंतर भारतीय संघ आपला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ 9 जूनला आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियमवर दोन्ही संघ भिडतील.


जेतेपद पटकावणार संघ होणार मालामाल-


टी-20 विश्वचषक पटकावणारा संघ मालामाल होणार आहे. टी-20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम 5.6 दशलक्ष डॉलर्स आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहिली तर ती अंदाजे 46.77 कोटी रुपये येते. त्याचबरोबर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 13.36 कोटी रुपये आहे. तर उपविजेत्याला 6.68 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे.


संबंधित बातम्या:


Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?


Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफच्या फेरीत पोहचू शकते; काय आहे समीकरण?, जाणून घ्या...


IPL 2024 Rohit Sharma: मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये रडताना दिसला रोहित शर्मा; त्याला बघून चाहतेही भावूक, पाहा Video