Border-Gavaskar Trophy 2024-25 : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला घरच्या मैदानावर 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला आहे. आता भारतीय संघाची आगामी कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात आहे. जिथे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळणार आहे. या दोघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका जिंकून भारत इतिहास रचू शकतो. कारण ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सलग दोनदा जिंकण्यात भारताला यश आले आहे. पण या दौऱ्यापूर्वी भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी एक भविष्यवाणी केली.
भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलऐवजी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका जिंकण्यावर भर द्यावा, असे मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, "मला वाटत नाही की भारत ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करू शकेल. जर तसे झाले तर ती एक मोठी उपलब्धी असेल, परंतु सध्या त्याच्याकडून अपेक्षा ठेवणे योग्य नाही. मला वाटते की संघाने फक्त जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मालिका 1-0, 2-0 किंवा 3-1 अशी असली पाहिजे. यामुळे संघाच्या कामगिरीत स्थिरता येईल आणि चाहत्यांनाही संघाचा अभिमान वाटेल.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 4-0 ने जिंकावी लागेल. भारत याआधी दोनदा WTC फायनल खेळला आहे आणि तिसऱ्यांदा पोहोचणे ही एक मोठी उपलब्धी असेल. पण यावेळी संघाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे, कारण इतर देशांच्या निकालांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. गावसकर यांच्या मते, टीम इंडियावर मालिका जिंकण्यासाठी नक्कीच दबाव असेल, पण त्यांना हे देखील समजून घ्यावे लागेल की 4-0 ने जिंकणे केवळ अवघड नाही पण त्यांना लक्ष केंद्रित करावे लागले.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
हे ही वाचा -