lightning strikes Viral video : आतापर्यंत क्रीडाक्षेत्रात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे तुम्ही अनेक खेळाडूंचा मृत्यू झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच, पण रविवार 3 नोव्हेंबर रोजी पेरूमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान विजेचा धक्का लागून एक भीषण अपघात घडला त्यामुळे एका खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. खरंतर, सामन्यादरम्यान अचानक हवामान खराब झाले, त्यावेळी अनेक खेळाडूंवर वीज पडली, अपघातात 39 वर्षीय बचावपटू जोस ह्यूगो डे ला क्रूझ मेझा यांचा मृत्यू झाला. या सामन्यात पंचांव्यतिरिक्त विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या इतर खेळाडूंना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पेरूच्या हुआनकायो शहरातील चिलाका येथे खेळल्या जात असलेल्या फुटबॉल सामन्यात अचानक खराब हवामानामुळे रेफ्रींनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सर्व खेळाडू परत आत चालले होते. तितक्यात अचानक वीज कोसळली आणि खेळाडू जोस ह्यूगो डे ला क्रूझ मेझा यांचा मृत्यू झाला. या अपघातात गोलरक्षक जुआन चोकाही गंभीर जखमी झाला. हा सामना तिथल्या दोन देशांतर्गत फुटबॉल क्लब जुवेताड बेलाविस्ता आणि फॅमिलिया चोका यांच्यात खेळला जात होता.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फुटबॉल मॅचच्या अपघाताच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, वीज पडली तेव्हा अनेक खेळाडू मैदानावर पडले. फुटबॉल सामन्यादरम्यान असा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही या वर्षी फेब्रुवारी महिन्यात इंडोनेशियाच्या एका 30 वर्षीय फुटबॉल खेळाडूचा वीज पडून मृत्यू झाला होता.
वीज पडण्याची शक्यता असल्यास काय करावे?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा वीज पडण्याचा धोका असतो तेव्हा एखाद्याने ताबडतोब घर किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. मोकळ्या जागेत, विशेषत: झाडांखाली असणे, अत्यंत धोकादायक असू शकते. याशिवाय नद्या किंवा तलावांपासून दूर राहावे, कारण पाणी हे विजेसाठी उत्तम वाहक आहे. छत्री किंवा सायकलीसारख्या धातूच्या वस्तूंपासूनही अंतर राखले पाहिजे.
काय करू नये?
जर तुमच्या परिसरात वीज पडण्याचा धोका असेल तर रस्त्यावर उभे राहणे टाळा आणि जर तुम्ही समूहात असाल तर वेगळे उभे राहण्याचा प्रयत्न करा. घरातही फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळावे, कारण विजेचा धक्का बसण्याचा धोका असतो.
हे ही वाचा -