गयाना : भारतानं इंग्लंडला (Ind vs Eng)68 धावांनी पराभूत करत ट्वेन्टी ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरनं (Jos Butler) टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतानं रोहित शर्मा, (Rohit Sharma) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 7 विकेटवर  171 धावा केल्या. भारतानं केलेल्या धावांचा पाठलाग करताना अक्षर पटेल (Axar Patel) आणि कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) फिरकी गोलंदाजीच्या जोडीनं इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुंग लावला. भारतानं कसा विजय मिळवला, जाणून घ्या महत्त्वाची पाच कारणं.


जोस बटलरचा निर्णय चुकला


इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलर यानं 2022 च्या सेमी फायनलचा विचार करुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मानं टॉसवेळीच सांगितलं होतं की आम्ही जरी टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंग करणार होतो. रोहितनं जोस बटलरच्या या निर्णयाचा फायदा करुन घेतला.




रोहित आणि सूर्यकुमारची भागिदारी


रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. विराट कोहलीनं टॉप्लीला एक खणखणीत षटकार मारला. यानंतर पुन्हा तसाच बॉल मारण्याच्या प्रयत्नात  तो बाद झाला. रिषभ पंत देखील चांगली फलंदाजी करु शकला नाही. रिषभ 4 धावा करुन बाद झाला. यानंतर मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव मैदानात आला. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या रोहितला कुणीतरी साथ देणं गरजेचं होतं. सूर्यकुमार यादवनं ती भूमिका पार पाडली. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवची 50 बॉलमधील 73 धावांची भागिदारी गेमचेंजर ठरली. रोहित शर्मानं 57 तर सूर्यकुमार यादवनं 47 धावा केल्या. 


हार्दिक पांड्याचे 2 सिक्सर


रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताकडून शिवम दुबे फलंदाजीला येण्याऐवजी उपकप्तान हार्दिक पांड्या फलंदाजीला आहे. थोड्या वेळानंतर सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाला फलंदाजीला पाठवण्यात आलं. हार्दिक पांड्यानं ख्रिस जॉर्डनला लागोपाठ दोन सिक्स मारत इंग्लंडवर दबाव आणला. त्यामुळं भारतानं वेगात धावा केल्या. 


अक्षर पटेल आणि कुलदीप यादवचं वादळ


इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर यानं 2022 च्या सेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध आक्रमक फलंदाजीची रणनीती वापरली होती ती वापरण्याचा प्रयत्न केला. अर्शदीप सिंगची ओव्हर चोपल्यानंतर जोस बटलरचा आत्मविश्वास वाढला होता. अक्षर पटेलला रिवर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्यानं पहिली विकेट टाकली. यानंतर इंग्लंडची फलंदाजी अक्षर पटेल आणि कुलदीप यापुढं गडगडली. अक्षर पटेलनं जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, मोईन अली यांना बाद केलं. तर, कुलदीप यादवनं  हॅरी ब्रुक, सॅम करन आणि ख्रिस जॉर्डनल बाद केलं. 


रोहित शर्माकडून योग्य बॉलिंग चेंजेस


रोहित शर्मानं गोलंदाजीमध्ये योग्य बदल केले. इंग्लंडचे फलंदाज अर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर जोरदार फटकेबाजी करतात हे लक्षात येताच रोहितनं अक्षर पटेलला बॉलिंग दिली. अक्षरनं भारताला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर जसप्रीत बुमराहला दुसऱ्या एंडनं बॉलिंगला आणत फिल सॉल्टची महत्त्वाची विकेट मिळवली. यानंतर कुलदीप यादवला गोलंदीजाला आणलं. फिरकी गोलंदाजांमुळं इंग्लंडच्या फलंदाजांवरील दबाव वाढवला. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या दमदार कामगिरीनं भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला. 


संबंधित बातम्या :


Axar Patel : येईल त्या ओवरमध्ये विकेट, इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवले, अक्षर पटेलसमोर इंग्रजांनी गुडघे टेकले!