Indian squad for FIFA U-17 women's World Cup 2022: भारतीय महिला अंडर-17 फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनरबी (Thomas Dennerby) यांनी 11 ऑक्टोबरपासून येथे सुरू होणाऱ्या फिफा अंडर-17 विश्वचषक स्पर्धेसाठी 21 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. यंदाच्या अंडर-17 फुटबॉल विश्वचषकाचं यजमानपदं यावेळी भारताला मिळालं आहे. या स्पर्धेत भारत अ गटात असून त्यांच्या गटात यूएसए, मोरोक्को आणि ब्राझीलचा समावेश करण्यात आला आहे. भारत या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना 11 ऑक्टोबरला अमेरिकाविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 14 आणि 17 ऑक्टोबरला अनुक्रमे मोरोक्को आणि ब्राझीलविरुद्ध मैदानात उतरेल. भारतीय संघाचे सर्व सामने भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर पार पडणार आहेत.


मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनरबी काय म्हणाले?
भारतीय महिला अंडर-17 फुटबॉल संघाची घोषणा करताना थॉमस डेनरबी म्हणाले की, "ही प्रत्येकासाठी नवीन परिस्थिती आहे. भारतानं यापूर्वी कधीही विश्वचषक खेळलेला नाही. हा खेळाचा पूर्णपणे वेगळा स्तर असेल.या स्पर्धेतील सामने 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, मडगाव (गोवा) आणि नवी मुंबई येथे खेळले जाणार आहेत."जेव्हा तुम्ही मैदानात असता, तेव्हा सर्व काही मागं राहतं आणि तुम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावं लागतं. भारतीय संघातील मुलींनीही हेच करायला हवं. आम्ही विजयाचा दावेदार म्हणून स्पर्धेत जात नाही. पण मला विश्वास आहे की, प्रतिस्पर्धी संघांवर दबाव असेल"


ट्वीट-






 


गोलकीपर: मोनालिसा देवी मोइरंगथम, मेलोडी चानू कीशम, अंजलि मुंडा.


डिफेंडर: अस्तम उरांव, काजल, नकेता, पूर्णिमा कुमारी, वार्शिका, शिल्की देवी हेमम.


मिडफील्डर: बबीना देवी लिशम, नीतू लिंडा, शैलजा, शुभांगी सिंह.


फॉरवर्ड: अनीता कुमारी, लिंडा कॉम सर्टो, नेहा, रेजिया देवी लैशराम, शेलिया देवी लोकतोंगबम, काजोल ह्यूबर्ट डिसूजा, लावण्या उपाध्याय, सुधा अंकिता टिर्की.


हे देखील वाचा-