T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. आयसासीच्या या मोठ्या स्पर्धेबाबत चांहत्यामध्ये कमालीची उस्तुकता लागली आहे. या स्पर्धेत भारत त्यांचा पहिला सामना (23 ऑक्टोबर) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळणार आहे. गेल्या वर्षी खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. अशा हाय व्होल्टेज सामन्यात खेळाडूंकडून अनेक चुका पाहायला मिळतात. कधी खेळाडू अवघड झेल घेतात, तर कधी त्यांच्या हातातून सोप्या झेलही सुटतात. दरम्यान, आयसीसी टी-20 विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर टाकुयात.


टी-20 विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारे फलंदाज:


1) डिविलियर्स
टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स अव्वल स्थानी आहे. डिव्हिलियर्स हा उत्तम क्षेत्ररक्षक आहे. तो मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात अगदी सहज क्षेत्ररक्षण करू शकतो. डीव्हिलियर्सनं टी-20 विश्वचषकातील एकूण 30 सामन्यांमध्ये सर्वाधिक 23 झेल घेतले आहेत.


2)मार्टिन गुप्टिल
न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिल ज्याप्रकारे आक्रमक फलंदाजी करतो, तसाच तो क्षेत्ररक्षणातही खूप चपळ आहे. मार्टिन गप्टिलनं आतापर्यंत टी-20 विश्वचषकातील एकूण 28 सामन्यांमध्ये 19 झेल घेतले आहेत.


3) डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं क्षेत्ररक्षण करतो. वॉर्नरच्या हातातून झेल सुटणं, जवळपास अशक्य मानलं जातं. वॉर्नरनं टी-20 विश्वचषकात आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 18 झेल घेतले आहेत.


4) रोहित शर्मा
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. या यादीत तो एकमेव भारतीय आहे. रोहित शर्मान टी-20 विश्वचषकात एकूण 33 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यात त्याच्या नावावर 15 झेलची नोंद आहे. 


5) ड्वेन ब्रावो
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो मैदानात प्रत्येक गोष्टीत योगदान देतो, हे सर्वांनीच पाहिलंय. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी नाहीतर क्षेत्ररक्षण तो नेहमीच अॅक्टिव्ह असतो. ब्राव्होनं टी-20 विश्वचषकात आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 15 झेल घेतले आहेत.


हे देखील वाचा-


IND vs SA 3rd T20: अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव; वाचा सामन्यातील 10 महत्वाचे मुद्दे


IND vs SA: भारतानं दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप देण्याची संधी गमावली; अखेरच्या सामन्यात 49 धावांनी पराभव