Independence Day 2022 Live : स्वातंत्र्यदिन चिरायू होवो! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; देशभरात जल्लोष
Independence Day 2022 Celebration Live : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर जल्लोष, ठिकठिकाणी रॅली आणि पदयात्रा, सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यातून देशाला संबोधित करणार
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील भूतमुगळी गावात अगदी उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गावातील बळीराजा सरसावल्याचं दिसून आलं. यावेळीू 60 बैलगाड्यांची फेरी काढत राष्ट्रध्वज हातात घेऊन गावभर हरिनामाचा गजर करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं संपूर्ण देश तीन रंगात रंगला असताना पंचवटी एक्स्प्रेसही अपवाद नाही. चाकरमान्यांची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रोज नोकरी, शिक्षणा निमित्तानं प्रवास करणाऱ्या पास धारकाची बोगी तीन रंगात सजविण्यात आली आहे. बोगीत सर्व सीटवर तीन रंगाचं कव्हर लावण्यात आलं आहेत. झेंडे, पताकांनी बोगी सजविण्यात आली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे सर्वच उत्सव साजरा साजरे केले जातात आणि आता स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव ही साजरा होत असल्याने प्रवाश्यानी उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम राखलीय
Independence Day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यांना तीन हेक्टर पर्यंत वाढीव मदत शासनाकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोनाचा धोका टळला नसून ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांनाही लसीकरण करण्याचे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस आशिक्षक यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी अतिवृष्टी काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचारी, पंचायत समिती, तहसील, जिल्हा परिषद, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात, पोलीस दलातील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
Independence Day 2022 : भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद कुमार आणि कर्मचारी तसेच नागरिक आदी उपस्थित होते.
Independence Day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज सिंधुदुर्गातील ओरोस येथील पोलीस परेड मैदानावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. सिंधुदुर्ग पोलीस परेड मैदानावर जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते खेळाडू, पोलीस, सन्मानित व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
Independence Day 2022 : घरकुल मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या महिलेने यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदाहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या सतर्कतेने आत्मदाहनाचा प्रयत्न फसला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शांता बनसोड असे महिलेचे नाव असून महिला यवतमाळ तालुक्यातील वाई येथील रहिवासी आहे. घरकुल मिळावे यासाठी महिला ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र, सरपंच, ग्रामसेवकांकडून प्रतिसाद मिळत नाही. अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी महिलेने तिच्याबरोबर पेट्रोल आणले होते. महिला आत्मदहन करणार असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच तिला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Independence Day 2022 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज परभणीत सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदार यांची उपस्थिती होती.
Independence Day 2022 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जातो. शाळा महाविद्यालयांमध्येसुद्धा याच स्वातंत्र महोत्सवाचा जल्लोष आज पाहायला मिळतोय, त्याच पद्धतीनं 375 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली हिंगोली शहरामध्ये काढण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं हिंगोली सिटी क्लबपासून संपूर्ण शहरांमध्ये ही रॅली काढण्यात आली. अनेक विद्यार्थी त्याबरोबर शहरातील नागरिक सहभागी झाले होते. भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावेळी सर्वांनी भारत देशाच्या जयघोषाच्या घोषणा सुद्धा दिल्या. पूर्ण शहरांमध्ये काढलेल्या या 371 कोटी तिरंगाच्या रॅलीमध्ये अनेक शाळकरी विद्यार्थी त्याचबरोबर विद्यार्थिनीसुद्धा सहभागी झाल्या होत्या.
Independence Day 2022 : मुलुंड येथे आयोजित मनसेच्या 'माझी पाच मिनिटं माझ्या राष्ट्रगीतासाठी' या कार्यक्रमात काल मध्यरात्री मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, शिरीष सावंत यांनी भर पावसात ध्वजारोहण केले. मनसेचे विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण आणि एकनिष्ठ प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम 15 ऑगस्टच्या मध्यरात्री आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी या ठिकाणी राष्ट्रपती भवनची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली होती. या ठिकाणी प्रथम गवणीचा गोविंदा पथकाने थर लावून सलामी दिली. त्यानंतर बिगुल च्या तालावर, एनसीसी कॅडेटची परेड, मशाल प्रज्वलन कार्यक्रम पार पडला. याच वेळी जोरदार पाऊस सुरू झाला, मात्र या वेळी व्यासपीठावर उपस्थित अमित ठाकरे आणि मनसेचे इतर नेते यांनी कार्यक्रम सुरूच ठेवला. यावेळी सर्व मुलुंडकरही भर पावसात उभेच राहिले. ध्वजारोहण भर पावसात पार पडले. यावेळी मोठ्या जल्लोषात नागरिकांनी एकत्र राष्ट्रगीत म्हटलं. या नंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि हा सोहळा संपन्न झाला.
Flag hoisting by CM Eknath Shinde at Thane : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त (Independence Day 2022) ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याचंच औचित्य साधून मध्यरात्री बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्याच्या (Thane) शिवसेना (Shiv Sena) शाखेत ध्वजारोहण (Flag hoisting) केलं. आनंद दिघे (Anand Dighe) जिल्हाध्यक्ष असताना मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची चाळीस वर्षापुर्वीची परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली असल्याचं हे दिसून आलं आहे. पण महत्वाचं म्हणजे, या कार्यक्रमात शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगणार होता. कारण ठाकरे गटात असलेले राजन विचारे यांना पोलिसांची नोटीस देऊनसुद्धा ते या कार्यक्रमात हजर होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु सुदैवानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.
Independence Day 2022 : देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून देशाला मानवंदना देण्यात येत आहे, विविध शासकीय कार्यालयात असे शाळा महाविद्यालयांमध्ये 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात येते. मात्र राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं रात्री बारा वाजून एक मिनिटांनी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. धुळे शहरातील चाळीसगाव रोड भागात असलेल्या सार्वजनिक हॉस्पिटल येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. शहनाज शेख आणि नाजनीन शेख या माता कन्येच्या हस्ते राष्ट्रसेवा दलाच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Independence Day Celebration : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जात आहे. यानिमित्ताने मभिवंडी शहरातील सरकारी कार्यालये तसेच महत्त्वाच्या ठिकाणच्या इमारती तिरंगा विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या आहेत. पालिकेच्या मुख्य कार्यालयासह इतर सरकारी कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी महापालिका, भिवंडी कोर्ट तसेच अनेक सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन महत्वाचं ठिकाण तिरंगा विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत.
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आज भारतीय नौदलकडूनसुद्धा ध्वजारोहणसोबत सेरेमोनिअल परेड केली जात आहे.
मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांडकडून INS शिक्रा येथे कमांड सेरेमोनियल परेड आयोजित करण्यात आली आहे.
व्हाइस अडमीनरल अजेंद्र बहादूर सिंग, FOC-in-C (पश्चिम) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Independence Day 2022 Live : आपल्या स्टोन आर्ट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या स्टोन आर्टस् आर्टिस्ट सुमन दाभोलकर यांनी 'आझादी का अमृतमहोत्सव' यानिमित्त देशभरात सुरू असलेल्या 'हर घर तिरंगा' या अभियानाला आपल्या स्टोन आर्ट्सच्या माध्यमातून साकार केलं आहे. सुमन यांनी कणकवली गावातील नदीच्या दगडापासून गावातील घरे, तिरंगा, मुलगा मुलगी हे सगळं दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
Independence Day 2022 Live : आज स्वातंत्र्यदिनी मुलुंड मिलन नगर येथे रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रेल्वे अपघातात मोनिका मोरे हिने दोन्ही हात गमावले होते आणि नंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि इतरांच्या मदतीनं, मोनिकाच्या दोन्ही हाताचे प्रत्यारोपण करण्यात आले. अमृत महोत्सवानिमित्ताने आज तिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या आणि मुलुंडवासिय उपस्थित होते. मोनिका सांगते मला कधी वाटलं नव्हतं माझे हात मला परत येतील. मात्र आज माझ्या हाताने अमृत महोत्सवानिमित्ताने ध्वजारोहण झाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. किरीट सोमय्या आणि सर्वांचे आभार यावेळी तिने व्यक्त केले.
PM MODI LIVE : मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल आणि ब्रिटीश राजवटीचा पाया हादरवणाऱ्या आपल्या असंख्य क्रांतिकारकांचा देश कृतज्ञ आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Modi LIVE : पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की, "संपूर्ण गुलामगिरीचा काळ स्वातंत्र्याच्या लढ्यात घालवला. भारताचा असा एकही कोपरा नाही जिथे लोकांनी शेकडो वर्ष गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही. त्याग केला नाही. आज आपण सर्व देशवासियांना प्रत्येक महापुरुषांना, त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्याची संधी आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घेण्याची ही संधी आहे."
PM Modi LIVE : देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "या स्वातंत्र्यदिनी मी सर्व भारतीयांना आणि भारतावर प्रेम करणाऱ्यांना शुभेच्छा देतो. नव्या निर्धारानं नव्या दिशेनं वाटचाल करण्याचा दिवस आहे."
PM Modi LIVE : देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, "आज भारताचा तिरंगा जगाच्या कानाकोपऱ्यात अभिमानानं फडकतोय."
Flag hoisting by PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजवंदन पार पडलं.
Independence Day 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर पोहोचले. तिथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी पीएम मोदी पांढरी पगडी घातली होती. ज्यामध्ये तिरंगा दिसत होता.
Independence Day 2022 : देशभरात आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा जल्लोष आहे. सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार आहेत. यावेळी प्रथमच पहिल्यांदा स्वदेशी तोफांची सलामी दिली जाणार आहे. पंतप्रधान आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं देशवासियांना कोणतं गिफ्ट देणार याची उत्सुकता आहे.
Independence Day : देशात आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने देशभर उत्साह आहे. राज्यातील त्या-त्या राजधानीच्या ठिकाणी संबंधित मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडणार आहे. तर देशाच्या विविध ठिकाणी आज विद्यार्थी आणि तरुणांकडून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
Independence Day 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळी 8.15 वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ते 9.15 वाजता मंत्रालयात ध्वजरोहणासाठी उपस्थित राहतील.
Independence Day 2022 : आज देश आपला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध कार्यक्रमांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची घोषणा केली असून देशवासियांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच स्वदेशी तोफेच्या सहाय्याने 21 तोफांची सलामी देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी 7.18 मिनीटांनी आगमन होणार आहे. त्या आधी ते राजघाटवर जाऊन त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लष्कराच्या तीनही दलांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे.
पार्श्वभूमी
Independence Day 2022 Live Updates : आज 15 ऑगस्ट. अर्थात आपला स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022). 15 ऑगस्ट 1947 रोजी याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपला भारत 75 व्या अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत. 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिनामागचा इतिहास नेमका काय आहे हे या माध्यमातून जाणून घेऊयात.
स्वातंत्र्यदिनाचा इतिहास (Independence Day 2022 History) :
इ.स. 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. 19व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. 1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य आणि युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाबी आणि सिंधींना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले.
स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व (Independence Day 2022 Importance) :
भारताचा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो कारण आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले आहे.
या दिवशी संपूर्ण देशात राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जाते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी ध्वज फडकविला जातो तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यातील लाहोरी गेटच्या वर भारतीय राष्ट्रध्वज उंचावला. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -