India Women vs Pakistan Women, Asia Cup 2022: निदा दारच्या (Nida Dar) अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान महिला क्रिकेट संघानं भारतासमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. शेल्हेट आंतराष्ट्रीय स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) सुरू असलेल्या महिला आशिया चषकातील तेराव्या सामन्यात कर्णधार बिस्मा मारूफनं (Bismah Maroof) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 20 षटकात 6 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि पूजा वस्त्राकरनं (Pooja Vastrakar) चांगली गोलंदाजी केलीय.


भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या डावातील पहिल्या सहा षटकात भारतानं चांगली गोलंदाजी केली. पाकिस्ताननं पावरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावून 33 धावा केल्या. पूजा वस्त्राकरनं भारताला पहिल यश मिळवून दिलं. त्यानंतर सहाव्या षटकात दीप्ती शर्मानं पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. कर्णधार बिस्माह मारूफन आणि निदा डारनं पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनी पाकिस्तानची धावसंख्या 100 पार नेली. दरम्यान, भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूनं बिस्माहला आऊट करून पाकिस्तानच्या संघाला चौथा झटका दिला. पाकिस्तानची पाचवी विकेट्सही लवकर पडली. त्यानंतर पूजा वस्त्राकरनं आलिया रियाजला आऊट केलं. पाकिस्ताननं 20 षटकात 6 विकेट्स गमावून भारतासमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून पूजा वस्त्राकरनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, दीप्ती शर्माला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, रेणुका सिंहच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.


ट्वीट-






 


संघ-


भारतीय महिला संघ-
स्मृती मानधना, सभिनेनी मेघना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दयालन हेमलता, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकार, राधा यादव, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड.


पाकिस्तानचा संघ-
मुनीबा अली (विकेटकिपर), सिद्रा अमीन, बिस्मा मारूफ (कर्णधार), ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​सादिया इक्बाल, तुबा हसन, आयमान अन्वर, नशरा संधू. 


आशिया चषकात भारतीय महिलांची चमकदार कामगिरी
महिला आशिया चषकातील सर्वात मोठा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जातोय. विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाला स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवून उपांत्य फेरीत स्थान पक्कं करायचं आहे. या स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला आहे. भारताविरुद्धच्या महामुकाबल्या आधी पाकिस्तानला थायलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 


हे देखील वाचा-