IND W vs ENG W : भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघात कॉमनवेल्थ गेम्समधील सेमीफायनलचा सामना सुरु झाला आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे इंग्लंडच्या महिला आता गोलंदाजीसाठी मैदानात आल्या आहेत. आजचा हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असून जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये एन्ट्री मिळवून पदक निश्चित करणार आहे.
आज सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये एन्ट्री मिळवणार आहे. त्यानंतर फायनलमध्ये न्यूझीलंडचा महिला संघ आणि ऑस्ट्रेलियाचा महिला संघ यांच्यातील विजेत्या संघाशी आजचा सामना जिंकणारा संघ फायनल खेळेल. आजचा सामना गमावणाऱ्या संघाला देखील तिसऱ्या स्थानासाठी अर्थात कांस्य पदकासाठी सामना खेळण्याची एक संधी असणार आहे.
भारताचा आजच्या सामन्यासाठीचा संघ खालीलप्रमाणे
बारबाडोसला नमवून भारत सेमीफायनलमध्ये
याआधीच्या सामन्यात भारताने बारबाडोसला मात देत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली. त्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं 20 षटकात चार विकेट्स गमावून 162 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्मानं 26 चेंडूंत सात चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 43 धावा केल्या. तर जेमिमा रॉड्रिग्जनं 46 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची नाबाद खेळी केली. जेमिमाचं हे सातवं अर्धशतक होतं. जेमिमाह आणि दीप्ती यांनी पाचव्या विकेटसाठी 70 धावांची शानदार भागीदारी केली. दीप्ती शर्मानंही नाबाद 34 धावांचं योगदान दिलं. ज्यानंतर भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बार्बाडोसच्या संघ 62 धावापर्यंतचं मज मारू शकला. या सामन्यात बार्बाडोसकडून किसिया नाइटनं सर्वाधिक 16 धावांची खेळी केली. त्यानंतर बार्बाडोसच्या एकही फलंदाला 15 धावांचा आकडा गाठता आला नाही. ज्यामुळं बार्बाडोसला 100 धावांनी विजय पत्कारावा लागला. भारताकडून रेणुका सिंहनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मेघना सिंह, स्नेह राणा, राधा यादव आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.
हे देखील वाचा-