India Women vs Australia Women 2nd T20: मुंबईतील (Mumbai) डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी बजावतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
ट्वीट-
ट्वीट-
कधी, कुठे पाहता येणार सामना?
भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज (11 डिसेंबर) मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळवला जाईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. भारतीय वेळेनुसार, या सामन्याला संध्याकाळी 7:00 वाजता सुरूवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर भेट देऊ शकतात.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 25 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाच्या संघानं 18 सामने जिंकले आहेत. तर, भारताला फक्त सहा सामन्यात विजय मिळवता आलाय. यातील एक सामना अर्निर्णित ठरलाय. ही आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलियाच्या संघाचं पारडं जडं दिसत आहे.
संघ
ऑस्ट्रेलिया महिला संघाची प्लेइंग इलेव्हन:
बेथ मूनी, अॅलिसा हिली (कर्णधार/विकेटकिपर), ताहलिया मॅकग्रा, अॅशलेग गार्डनर, एलिस पेरी, फोबी लिचफील्ड, अॅनाबेल सदरलँड, हेदर ग्रॅहम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट.
भारतीय महिला संघाची प्लेइंग इलेव्हन:
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), देविका वैद्य, रिचा घोष (विकेटकिपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, अंजली सरवानी, मेघना सिंह, रेणुका ठाकूर सिंह.
हे देखील वाचा-