हरारे : अभिषेक शर्माने आंतराष्ट्रीय टी 20 करिअरमध्ये दुसऱ्याच मॅचमध्ये स्फोटक फलंदाजी केली. अभिषेक शर्मानं झिम्बॉब्वेच्या ( IND vs ZIM ) गोलंदाजांना फोडून काढलं. पहिल्या टी 20 मॅचमध्ये शुन्यावर बाद झालेल्या अभिषेक शर्मानं (Abhishek Sharma Century) आज शतक झळकावलं. अभिषेक शर्मानं कालच टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलं होतं. हरारेत स्फोटक फलंदाजीच्या जोरावर अभिषेक शर्मानं अनेक विक्रम मोडले.  


टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिलनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मानं भारताच्या डावाची सुरुवात केली. शुभमन गिल आज केवळ 2 धावा करुन बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडनं 137 धावांची भागिदारी केली. अभिषेक शर्मानं आज झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 7 चौकार आणि 8 षटकार मारले. अभिषेक शर्मा 47 बॉलमध्ये 100 धावा काढून बाद झाला. 


भारताकडून  खेळताना दुसऱ्याच मॅचमध्ये शतक


अभिषेक शर्मानं टी20 करिअरमध्ये पहिलं शतक दुसऱ्याच मॅचमध्ये केलं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल. राहुल यांच्यासारखे दिग्गज खेळाडू पहिलं शतक झळकवण्यामध्ये अभिषेक शर्माच्या मागे राहिले आहेत. भारतासाठी सर्वात कमी टी 20 सामन्यांमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम दीपक हुड्डाच्या नावावर होता. त्यानं तिसऱ्या मॅचमध्ये अर्थशतक झळकावलं होतं. अभिषेक शर्मानं ही कामगिरी दुसऱ्याच मॅचमध्ये करुन दाखवली. शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालनं सहाव्या मॅचमध्ये शतक केलं होतं. 


रोहित-विराटला न जमलेली कामगिरी करुन दाखवली


भारतासाठी टी 20 करिअरच्या दुसऱ्याच मॅचमध्ये शतक करण्याची कामगिरी कुणी करु शकलेलं नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज देखील अशी कामगिरी करु शकले नाहीत. रोहित शर्मा टी 20 मध्ये भारताच्या डावाची सुरुवात करतो मात्र, त्याला देखील अशी कामगिरी करता आलेली नाही. 


दरम्यान, टीम इंडियानं 20 ओव्हरमध्ये 234 धावा केल्या. यामध्ये अभिषेक शर्माच्या 100, ऋतुराज गायकवाडच्या 77 आणि रिंकू सिंगच्या 48 धावांचं योगदान आहे. काल प्रभावी ठरलेली झिम्बॉब्वेची फलंदाजी आज प्रभाव पाडू शकली नाही. झिम्बॉब्वेला भारतावर विजय मिळवायचा असल्यास 235 धावा कराव्या लागतील. मुकेश कुमार आणि आवेश खाननं झिम्बॉब्वेच्या डावाला गोलंदाजीच्या जोरावर हादरे दिले.    


संबंधित बातम्या : 


IND vs ZIM : भारतानं पराभवाचा वचपा काढला, अभिषेक- ऋतुराज अन् रिंकू सिंगची फटकेबाजी, झिम्बॉब्वेपुढं धावांचा डोंगर रचला


Abhishek Sharma : अभिषेक शर्माची वादळी खेळी, दुसऱ्याच मॅचमध्ये शतकाला गवसणी, झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांची धुलाई