India tour of Zimbabwe 2024 : टीम इंडिया पाच टी20 सामन्याच्या मालिकेसाठी झिम्बॉब्वे दौऱ्यावर जात आहे. या मालिकेत टीम इंडियाची धुरा युवा शुभमन गिल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. 6 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. झिम्बॉब्वेमधील हरारे स्पोर्ट्स ग्राऊंडवर पाचही सामने होणार आहेत. भारतीय वेळानुसार, दुपारी 4.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. झिम्बॉबे संघाची धुरा अनुभवी सिकंदर रझा याच्या खांद्यावर आहे.
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पहिला टी20 सामना 6 जुलै 2024 रोजी होणार आहे. दुसरा टी 20 सामना 7 जुलै, तिसरा 10 जुलै, चौथा 13 जुलै आणि अखेरचा टी20 सामना 14 जुलै रोजी होणार आहे. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर होणार आहेत. भारतीय वेळानुसार, दुपारी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
सामना कुठे पाहाल ?
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील टी20 मालिकेचं प्रसारण इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर भारतीय चाहत्यांना सामन्यांचा आनंद घेता घेईल. टिव्हीवर Sony Ten 3 (हिंदी) आणि Sony Ten 4 (तामिळ/तेलुगू) वर सामने पाहता येतील. सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Sony Liv' या ॲपवर उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला सब्स्क्रिप्शन घ्यावं लागेल.
IPL 2024 मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यात रायन पराग, अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे, खलील अहमद, ध्रुव जुरेल, आवेश खान आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. बीसीसीआयने झिम्बाब्वेला सर्व युवा खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतलाय. अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आलाय.
नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
आयपीएल 2024 मध्ये सनरायजर्स हैदाराबादसाठी शानदार कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी यालाही संघात स्थान देण्यात आले होते. पण दुखापतीमुळे त्याला मालिकेतून वगळण्यात आले. रेड्डीच्या जागी शिवम दुबे याला संघात स्थान देण्यात आलेय. रेड्डीची दुखापत कोणती आहे, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही. रेड्डी याला पहिल्यांदाच टीम इंडियाकडून बोलवणं आलं होतं, पण दुखापतीमुळे त्याच पादर्पण आता लांबणीवर पडलेय.
टीम इंडियाचे 15 शिलेदार
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे
झिम्बाब्वेच्या ताफ्यात कोण कोण ?
सिकंदर रजा (कर्णधार), अकरम फराज, बॅनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, तेंदई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसेंट काइया, क्लाइव मडांडे, वेस्ली मधेविरे, तदिवनाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्जा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुजरबानी, डायोन मायर्स, अंतुम नकवी, रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा
झिम्बॉब्वे दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक - |
|||||
Sr. No. |
Date |
Day |
Match |
Venue |
Time |
1st T20I |
06-जुलै 2024 |
Saturday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |
2nd T20I |
07-जुलै 2024 |
Sunday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |
3rd T20I |
10-जुलै 2024 |
Wednesday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |
4th T20I |
13-जुलै 2024 |
Saturday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |
5th T20I |
14-जुलै 2024 |
Sunday |
जिम्बाब्वे vs टीम इंडिया |
हरारे स्पोर्ट्स क्लब |
1:00 PM (4:30 PM IST) |