Team India Rohit Sharma Replacement : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 विश्वचषकावर नाव कोरले. आयसीसी स्पर्धेतील चषकाचा 11 वर्षांचा दुष्काल संपुष्टात आला. चषकावर नाव कोरल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहित शर्माची पोकळी भरुन निघणं तसं कठीण आहे, पण अशक्य नाही. रोहित शर्माची भूमिका पार पाडण्यासाठी टीम इंडियाकडे युवा खेळाडूंची फौज आहे. त्यातील पाच सर्वोत्तम दावेदाराबाबात जाणून घेऊयात.. 


1. यशस्वी जैस्वाल


बार्बाडोस येथे भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले. त्या संघाचा यशस्वी जैयस्वाल सदस्य राहिलाय. 15 जणांच्या चमूमध्ये यशस्वी जैस्वाल होता, पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही.यशस्वीने अवघ्या एका वर्षात  17 टी-20 सामन्यांमध्ये भारतासाठी 502 धावा चोपत, आपली छाप सोडली. त्याच्या नावावर एक शतक आणि 4 अर्धशतके आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट देखील 162 च्या आसपास आहे. जैस्वालने भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेत खेळताना चांगली कामगिरी केली आहे. तो रोहित शर्माप्रमाणे वेगाने धावा काढण्यास सक्षम आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर यशस्वी सलामीची जबाबदारी पेलावू शकतो. 


2. शुभमन गिल


शुभमन गिलने 2019 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. तेव्हापासून तो  एक विश्वासार्ह सलामीवीर म्हणून पुढे आला आहे. 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात रोहित शर्मासोबत सलामी करताना त्याने 9 सामन्यांमध्ये 354 धावा ठोकल्या होत्या. संघ व्यवस्थापनाने गिलवर दाखविलेल्या विश्वासाचेच फलित आहे की त्याच्याकडे झिम्बाब्वे दौऱ्यात 5 टी-20 सामन्यांसाठी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या 5 सामन्यातील कामगिरीच्या जोरावर तो टीम इंडियात सलामीवीर म्हणून आपले स्थान कायम करु शकतो. 


 


3. अभिषेक शर्मा
सनरायजर्स हैदराबादसाठी खेळताना अभिषेक शर्माने वादळी फलंदाजी केली. तो खेळत असताना ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेडही फिका वाटत होता. शर्मा नेहमीच वेगवान खेळी खेळतो.  त्याने आयपीएल 2024 मध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने निवडकर्त्यांवर छाप पाडली. अभिषेकने या आय़पीएल 2024 मध्ये 16 सामन्यात 204 च्या स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या. 


4. केएल राहुल


केएल राहुलने भारतासाठी अखेरचा टी20 सामना  2022 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळला. त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये संधी दिली नाही. पण अनुभवाच्या आधारे त्याला रोहित शर्माची जागा दिली जाऊ शकते. राहुलने भारतासाठी 54 टी-20 सामन्यांमध्ये सलामी करताना 1,826 धावा केल्या आहेत. राहुलच्या आगमनाने टीम इंडियाला रोहितसारखा अनुभवी फलंदाज टॉप ऑर्डरमध्ये मिळू शकतो.


5. ऋतुराज गायकवाड़
ऋतुराज गायकवाडला टीम इंडियामध्ये म्हणावी तितकी संधी मिळत नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने प्रभावी कामगिरी केली.  आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात त्याने चेन्नईसाठी 500 हून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्वही केले आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 19 टी-20 सामन्यांमध्ये 500 धावा  केल्या आहेत.