India vs West indies T20 : कसोटी आणि वनडे मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या टी20 मालिका सुरु आहे. पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिज सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. आज फ्लोरिडामध्ये चौथा सामना होणार आहे.  सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात युवा तिलक वर्माने दमदार कामगिरी केली आहे. यशस्वी जायस्वाल याला पदार्पणात छाप सोडता आली नाही. पण तो आजच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करेल. भारताचे गोलंदाजी कोच पारस म्हाब्रे यांनी तिलक वर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलेय. पारस म्हाब्रे यांना तिलक आणि यशस्वी या दोन युवा फलंदाजांना गोलंदाजी करताना पाहायचेय. 


पारस म्हाब्रे यांनी या दोन्ही युवा खेळाडूंचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांच्याकडून गोलंदाजाचीही आपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटलेय. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार पारस म्हाब्रे म्हणाले की,  ' यशस्वी आणि तिलक यांना मी अंडर-19 मध्ये पाहिलेय. या दोघांमध्येही चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यावर सध्या काम सुरु आहे. ही मोठी प्रोसेस आहे. पण ते लवकरच गोलंदाजी करतील. कमीत कमी ते एक षटकाची गोलंदाजी करु शकतात. ''






दरम्यान, तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी आतापर्यंत दमदार कामगिरी करत सर्वांचेच लक्ष्य वेधलेय. तिलक वर्माने तीन टी 20 सामन्यात 139 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तिलक वर्माने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 25 सामन्यात 1236 धावा केल्या आहे. यामध्ये पाच शतके आणि पाच अर्धशतकाचा समावेश आहे. त्याशिवाय आठ विकेटही घेतल्या आहेत. फर्स्ट क्लास सामन्यात तिलक वर्माने 523 धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय तीन विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे यशस्वी जायस्वालने दोन कसोटी सामन्यात 266 धावा केल्या आहेत. आतापर्यंत फक्त एका टी 20 सामन्यात त्याला संधी मिळाली. यशस्वीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 32 सामन्यात 1511 धावा केल्या आहेत. त्याशिवाय सात विकेटही घेतल्या आहेत. फर्स्ट क्लास सामन्यात 2111 धावा केल्या आहेत. 


आणखी वाचा :


IND vs WI 4th T20I: चौथ्या टी20 मध्ये टीम इंडियात बदलाची शक्यता, अशी असेल युवा ब्रिगेड
IND vs WI : भारतासाठी 'करो या मरो'ची लढाई, युवा ब्रिगेड मालिकेत बरोबरी साधणार का?