Rohit Sharma ODI Records: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात येत्या 6 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माकडं अनेक विक्रम रचण्याची संधी आहे. या मालिकेत रोहित शर्मा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि मोहम्मद अजहरुद्दीनचा (Mohammad Azharuddin) विक्रम मोडू शकतो. हे विक्रम नेमके कोणते आहेत? यावर एक नजर टाकुयात.


वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम
रोहित शर्मानं वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत 1 हजार 523 धावा केल्या आहेत. या तीन सामन्यांच्या मालिकेत त्यानं आणखी 51 धावा केल्या तर तो वेस्ट इंडीज संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेईल. या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 1 हजार 573 धावांची नोंद आहे. तर, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी आहे. त्यानं आतापर्यंत वेस्ट इंडीजविरुद्ध 2 हजार 235 धावा केल्या आहेत. 


वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकांचा विक्रम
रोहित शर्मानं वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्या आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत. जर त्यानं आणखी 2 शतके झळकावल्यास तो सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो. सचिन तेंडूलकरनं वेस्ट इंडीजविरुद्ध 4 शतक केली आहेत. या यादीतही विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीनं वेस्ट इंडीजविरुद्ध आतापर्यंत 9 शतक केली आहेत. 


अजहरुद्दीनला टाकणार मागे
रोहित शर्माच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 हजार 205 धावा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन सातव्या क्रमांकावर आहे. अजहरुद्दीनच्या नावावर 9 हजार 378 धावांची नोंद आहे. जर वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मानं आणखी 174 धावा केल्यास तो अजहरुद्दीनला मागे टाकणार आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha