Virat Kohli Record: भारत आणि वेस्ट इंडीज (IND Vs WI) यांच्यात येत्या 6 फेब्रुवारीपासून तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. वेस्ट विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली नव्या विक्रमाला गवसणी घालू शकतो. मायदेशात एकदिवसीय सामन्यात 5000 धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरणार आहे. यासाठी त्याला केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. या यादीत भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एकमेव खेळाडू आहेत. त्यांच्यानंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला मायदेशात खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात 5000 धावांचा टप्पा गाठता आला नाही.

सचिन यांनी 121व्या डावात वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात 5,000 एकदिवसीय धावांचा टप्पा गाठला होता. तर, विराट कोहलीनं केवळ 95 डावात 4994 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटनं आणखी 6 धावा केल्यास त्याच्याही 5000 धावा पूर्ण होतील. तसेच मायदेशात 5000 धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली सचिननंतर दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. 

वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघरोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.

भारत- वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha