IND Vs WI T20 Series: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी नसेल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु, क्रिकेट असोसिएशन बांग्लादेशचे (Cricket Association of Bengal) अध्यक्ष अविषेक डालमिया (Avishek Dalmiya) यांनी याबाबत बीसीसीआयकडून (BCCI) कोणतंही लेखी पत्र मिळालं नाही, अशी माहिती दिलीय. 


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात येत्या 6 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 16 फेब्रुवारीपासून टी-20 मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहेत. तर, टी-20 सामने कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये रंगणार आहे. 


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन टी-20 सामने प्रेक्षकांविना खेळले जाणार असल्याच्या मीडिया रिपोर्ट्सवर प्रतिक्रिया देताना अविशेक दालमिया म्हणाले होते की, "सध्या प्रसारमाध्यमांवर भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही, असं सांगितलं जातंय. परंतु, याबाबत बीसीसीआयकडून आम्हाला अद्याप कोणतंही लेखी पत्र मिळालं नाही. यामुळं यासंबंधित कोणतीही प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही", असं अविशेक दालमिया यांनी म्हटलंय. 


भारताचा टी-20 संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल , युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.


वेस्ट इंडीजचा टी-20 संघ:
पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॅमनिक डेरेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स हेडन वॉल्स.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha