India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज तिसरा टी20 सामना पार पडत आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली असून वेस्ट इंडीजने 164 धावा करत भारतासमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. वेस्ट इंडीजकडून काईल मायर्सनं (73) दमदार अर्धशतक ठोकल्यामुळे विंडीजने एक चांगली धावसंख्या उभारत भारताला तगडं आव्हान दिलं आहे.
सामन्यात सर्वप्रथम भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती भारताने आखली होती. पण वेस्ट इंडीजकडून काईल मायर्स याने एकहाती झुंज देत अखेरपर्यंत संघाचा डाव सावरला. त्याने 50 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर फलंदाजांनी खास कामगिरी केली नाही. पण वेस्ट इंडीज एक तगडं आव्हान भारतासमोर ठेवू शकली आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक दोन तर हार्दीक आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
एकदिवसीय मालिकेतील (One day Series) तिन्ही सामने भारताने जिंकले आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश (India vs West Indies ODI) दिला. ज्यानंतर आता भारत टी20 मालिकाही (T20 Series) जिंकून एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला खरा पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आता आज तिसरा सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिके आघाडी घेऊ शकतो
हे देखील वाचा-