IND vs WI : भारत (India) आणि वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) 12 जुलैपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका (India vs West Indies Test Series) खेळवली जाणार आहे. याआधी टीम इंडियाचे (Team India) तीन वेगवान गोलंदाज अडचणीत आले आहेत. जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat), मुकेश कुमार (Mukesh Kumar) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या शर्यतीत आहेत. वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामन्यामध्ये या तिघांपैकी नेमकी कुणाला संधी द्यावी, हा प्रश्न सध्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुढे आहे. सिराज आणि शार्दुल ठाकूरसह मैदानात तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून कोण उतरणार हे पाहावं लागणार आहे. 


वेस्ट इंडिज विरुद्ध कशी असेल प्लेईंग 11? 


टीम इंडियाकडे स्पिनर्समध्ये रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा आहे. त्याशिवार अक्षर पटेल देखील आहे, तो जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू आहे. या मालिकेत टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. सिराज आणि शार्दुल यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असताना तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून कुणावर विश्वास दाखवावा हा सवाल रोहित शर्मा समोर आहे.


उनाडकट, मुकेश आणि सैनी यांच्यात शर्यत


टीम इंडियाने जवळजवळ आपली प्लेईंग 11 निवडली आहे, पण एका जागेसाठी आता तीन जण दावेदार आहेत. कोणत्या खेळाडूला संधी द्यावी हा मोठा प्रश्न आहे. तिसऱ्या वेगवान फलंदाज ठरवणं सध्या काहीसं कठीण बनलं आहे. टीम इंडियाकडे वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे शार्दुल ठाकूरवर मोहम्मद सिराजसह वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. 


टीम इंडियाचा तिसऱ्या वेगवान गोलंदाज कोण?


तिसरा वेगवान गोलंदाज निवडणे भारतासाठी सोपं नाही कारण, तिन्ही वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. नवदीप सैनी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो वेग कमी न करता लांब स्पेल टाकू शकतो. रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या उनाडकटने नुकतीच बांगलादेशविरुद्ध 12 वर्षांनंतर दुसरी कसोटी खेळली. मुकेशही तिसऱ्या गोलंदाजासाठी प्रवळ दावेदार आहे. गेल्या तीन मोसमात त्याने आपल्या खेळात बरीच सुधारणा केली आहे. त्यामुळे या तिघांपैकी नेमकी कुणावर रोहित शर्मा विश्वास दाखवणार हे लवकरच कळेल. 


संबंधित इतर बातम्या :


India Richest Cricketer : तेंडुलकर, कोहली किंवा धोनी नाही, 'ही' व्यक्ती भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू