U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या (Under 19 WC) अंतिम सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सामन्याला सुरुवात 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर (Sir Vivian Richards Stadium) खेळवला जाणार आहे. भारतीय संघ अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरीत पाचव्या जगज्जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर आहे. 



सामन्यासाठी अंतिम संघ


भारत: यश धूल (कर्णधार), अंक्रिश रघुवंशी, हर्नुर सिंग, शेख रशीद, निशांत सिंधू, कौशल तांबे, दिनेश बाणा, राज बावा, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगर्गेकर, रवी कुमार.


इंग्लंड: टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जॉर्ज थॉमस, जेकब बिथेल, जेम्स ऱ्यू, विल्यम लक्स्टन, रेहान अहमद, अ‍ॅलेक्स हॉर्टन, जेम्स सेल्स, थॉमस स्पिनवॉल, जोशुआ बॉयडेन


अंडर-19 विश्वचषकामध्ये दोन्ही संघाची कामगिरी


अंडर-19 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघानं एकही सामना गमवला नाही. या दोन्ही संघांनी आपापल्या गटातील सर्व 3 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकले. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत दोन्ही संघानं चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिलीय. यामुळं भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा अंतिम सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha