Sri Lanka Tour Of India: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात येत्या 3 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ कोलंबोहून भारतात रवाना झालाय. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं सोशल मीडियावर खेळाडूंचे काही फोटो शेअर केले आहेत. या मालिकेसाठी श्रीलंकेसोबतच भारतानंही आपल्या संघाची घोषणा केली होती.
भारत दौऱ्यात दासुन शनाका श्रीलंकेच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. श्रीलंकेनं पथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो यांना दोन्ही मालिकेत संघात स्थान दिलं आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या संघाला भारतात रवाना होण्यापूर्वी श्रीलंका बोर्डानं त्याच्या खेळाडूंचे काही फोटो ट्विटरवर शेअर केली आहेत. यातील एका चित्रात संपूर्ण टीम आणि कर्मचारी दिसत आहेत.
ट्वीट-
कसं असेल श्रीलंकेचा भारत दौरा?
महत्वाचे म्हणजे, 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका सुरू होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 5 जानेवारीला पुण्यात आणि 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर लगेच 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरूवात होईल. पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारीला आणि तिसरा सामना 15 जानेवारीला होणार आहे.
श्रीलंकेचा टी-20 संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा
भारताचा टी-20 संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.
हे देखील वाचा-