IND vs SA, 5th T20: बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळं भारताची इतिहास रचण्याची संधी हुकली. दरम्यान दक्षिण आफ्रिकेनं या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकत मालिकेवर मजबूत पकड बनवली. परंतु त्यानंतर रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघानं दमदार पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकला. परंतु, पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात पावसानं हजेरी लावली आणि भारताचं मायदेशात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याचं स्वप्न भंगलं. पावसामुळं सामना रद्द झाल्यानं मैदानातील प्रेक्षकही निराश झाले. महत्वाचं म्हणजे, पावसामुळं हा सामना रद्द झाल्यानं प्रेक्षकांना त्यांच्या तिकिट दराच्या 50 टक्के रक्कम परत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 


पावसामुळं पाचवा टी-20 सामना
या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाच्या डावातील चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडू टाकण्याआधी पावसाला सुरुवात झाली. पाचव्या टी-20 सामन्यापूर्वीच बंगळुरू येथे पाऊस पडण्याची शक्यता हवामना खात्यानं वर्तवली होती. या मालिकेतील पाचवा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेवर नाव कोरेल, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही. 


भारतीय संघाचा पुढील दौरा
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिका खेळल्यानंतर भारत संघ आयर्लंड दौरा करणार करणार आहे. या दौऱ्यावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. तर, कसोटी संघ इंग्लंडविरुद्ध पुढे ढकलण्यात आलेला एकमेक कसोटी सामना खेळणार आहे. एजबेस्टन येथे 1-5 जून दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. 


हे देखील वाचा-