नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिली एकदिवसीय मॅच ड्रॉ झाली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी मॅच उद्या होणार आहे. भारताचे काही खेळाडू इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेट मालिकेत खेळत आहेत. काही दिवसांपूर्वी अजिंक्य रहाणे यानं दमदार फलंदाजी केल्याची बातमी समोर आली होती.दुसरीकडे भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये वनडे कप मध्ये नॉर्थहॅम्पटनशायर संघाकडून क्रिकेट खेळतोय. या मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यात पृथ्वी शॉनं दमदार फलंदाजी केली.
पृथ्वी शॉनं एकीकडे आक्रमक फलंदाजी केली मात्र, संघातील इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरले. पृथ्वी शॉनं 97 धावांची वादळी खेळी केली. मात्र, तो 3 धावांनी शतकापासून वंचित राहिला.
पृथ्वी शॉनं फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर दमदार फलंदाजी केली. पृथ्वी शॉनं केलेल्या फटकेबाजीच्या आधारे नॉर्थहॅम्पटनशायर संघानं 10 ओव्हरमध्ये 81 धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉचा सलामीचा दुसरा जोडीदार रिकार्डो वास्कोनलसेलोस 9 बॉलमध्ये 16 धावा करुन बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या 53 धावा होत्या.
पृथ्वी शॉनं 31 बॉलमध्ये अर्धशतक केलं. पृथ्वी शॉनं 71 बॉलमध्ये 97 धावांची खेळी केली. त्यामध्ये 16 चौकार आणि एक षटकार पृथ्वी शॉ यानं मारले. पृथ्वी शॉ जेव्हा बाद झाला तेव्हा त्याच्या संघाच्या धावा 148 धावा झाल्या होत्या. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर त्यांचा संघ 260 धावांवर बाद झाला. एकीकडे पृथ्वी शॉनं 16 चौकार मारले मात्र इतर 10 फलंदाजांनी मिळून 10 चौकार मारले.
पृथ्वीची वादळी खेळी, मात्र संघाचा पराभव
पृथ्वी शॉच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर नॉर्थहॅम्पटनशायरनं 260 धावांची खेळी केली. मात्र, डरहम संघानं या मॅचमध्ये 4 विकेटनं मॅच जिंकली. डरहमच्या कॉलिन एकरमॅन यानं 106 बॉलमध्ये 108 धावांची खेळी केली. कॅप्टन एलेक्स लीसनं 55 बॉलमध्ये 55 धावा केल्या. स्कॉट वॉर्थविक यानं 42 धावा केल्या. यामुळं डरहम संघानं 4 विकेटनं विजय मिळवला.
संबंधित बातम्या :