IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्माशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्डेडिअमवर मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मानं (Rohit Sharma) आणखी एका विक्रमाची नोंद केलीय. तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहचलाय. हा विक्रम पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिक याच्या नावावर होता.


धर्मशाला येथील रोहितचा 125वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आहे. तो जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा खेळाडू ठरलाय. त्यानं या बाबतीत पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकचा विक्रम मोडला. शोएब मलिकच्या नावावर 124 टी-20 सामने खेळल्याची नोंद आहे.


सर्वाधिक टी-20 सामने खेळणारे पहिले पाच खेळाडू
सर्वाधिक टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हाफिज तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 119 सामन्यात पाकिस्तानच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं आतापर्यंत 115 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर 113 सामन्यासह बांगलादेशचा महमुदुल्ला पाचव्या क्रमांकावर आहे. 


भारतासाठी रोहित शर्माच्या 50 झेल
श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्मानं 50 झेल घेण्याचा टप्पा गाठला होता. भारतासाठी अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पहिला क्षेत्ररक्षक ठरला. 


रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताचा 16 टी-20 सामन्यात विजय
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं मायदेशात 16 वा टी-20 सामना जिंकलाय.  कर्णधार म्हणून मायदेशात सर्वाधिक टी-20 सामने जिंकणारे इयॉन मॉर्गन आणि केन विल्यमसनला रोहित शर्मानं मागे टाकलं आहे. त्यांच्या नावावर मायदेशात 15 जिंकल्याची नोंद आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha