कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरी वनडे कोलंबोमध्ये सुरु आहे. पहिल्या दोन वनडे प्रमाणं श्रीलंकेनं तिसऱ्या वनडेत देखील टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी तिसऱ्या वनडेत विजय महत्त्वाचा आहे. तिसऱ्या वनडेत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघ मैदानात उतारला आहे. भारतीय संघात आज रिषभ पंत आणि रियान पराग यांना संधी देण्यात आली. रियान परागनं आजच्या मॅचद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) आज केवळ एका वेगवान गोलंदाजाला संधी दिली. मोहम्मद सिराज याच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा होती. मोहम्मद सिराजनं (Mohammad Siraj) समरविक्रमाची एक विकेट घेतली. मात्र त्यापूर्वी मोहम्मद सिराज आणि कुसल मेंडिस (Kusal Mendis) यांच्यात वाद झाला होता.

  


श्रीलंकेच्या  फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली होती.  भारताकडून मोहम्मद सिराजला वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आलं होतं. आजच्या मॅचमध्ये मोहम्मद सिराज महागडा खेळाडू ठरला. सिराजनं  9 ओव्हरमध्ये 78 धावा दिल्या. या दरम्यान मोहम्मद सिराज श्रीलंकेच्या डावाची 39 वी ओव्हर सुरु होती. श्रीलंकेकडून दमदार फलंदाजी करणारा कुसल मेंडिस बॅटिंग करत होता. या ओव्हरमध्ये सुरुवातीला मोहम्मद सिराज आणि कुसल मेंडिस यांच्यात वादावादी झाली. सिराजनं यानंतर ओव्हरच्या पाचव्या बॉलवर समरविक्रमाला माघारी पाठवलं. समरविक्रमा एक रन देखील करु शकला नाही. सिराजनं त्याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. 


पंचांनी समरविक्रमाला नॉटआऊट दिलं होतं. रोहित शर्मानं पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत डीआरएस घेतला. हा निर्णय मोहम्मद सिराजच्या बाजूनं गेला. समरविक्रमा शुन्यावर बाद झाला. 


भारतापुढं 249  धावांचं आव्हान 


श्रीलंकेनं प्रथम फंलदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 248  धावा केल्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो यानं 96  धावा केल्या. तर, पथुम निसांका यानं 45  आणि कुसल मेंडिस यानं 59  धावा केल्या. भारताकडून रियान परागनं 3 विकेट घेत श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. 


भारताला विजय आवश्यक


भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडेत रोहित शर्माच्या टीमला विजय मिळवणं आवश्यक आहे. भारतीय संघ आज विजय मिळवल्यास मालिकेत बरोबरी करु शकतो. भारतानं गेल्या 27 वर्षांमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळं आजच्या मॅचमध्ये भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. 


मोहम्मद सिराज आणि मेंडिसचा वाद, पाहा व्हिडीओ






संबधित बातम्या  :


IND vs SL : फर्नांडो आणि निसांकाची आक्रमक सुरुवात, रियान परागनं डाव पलटवला, भारतापुढं विजयासाठी किती धावांचं आव्हान?


Rohit Sharma : सचिन तेंडुलकरच्या काळातील नकोसा विक्रम, रोहित शर्मावर तशीच वेळ येणार? टीम इंडियाला कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार कारण..