Gautam Gambhir Coach IND vs SL: टीम इंडियाचा श्रीलंका दौरा गौतम गंभीरसाठी खूप महत्त्वाचा होता, कारण तो पहिल्यांदाच संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली असली तरी वनडे मालिकेची सुरुवात चांगली झालेली नाही. रविवारी झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान श्रीलंकेने भारतीय संघाचा 32 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर गौतम गंभीरची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांकडून गौतम गंभीरला ट्रोल देखील केले जात आहे. 


गौतम गंभीरच्या आगमनाने भारतीय संघात अनेक बदल झाले आहेत. काही मोजकेच खेळाडू असतील जे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतील. दरम्यान, वनडेच्या संघाच्या फलंदाजी क्रमवारीत सातत्याने बदल होत असतानाच टी-20 फॉरमॅटमध्ये नवा संघ तयार करण्यात आला आहे. या बदलामुळे नेटकरी गौतम गंभीरला प्रचंड ट्रोल करत आहेत. जेव्हा फलंदाज त्यांच्या क्रमवारीत चांगली कामगिरी करत असतील तेव्हा प्रयोग करण्याची काय गरज काय?, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.






गौतम गंभीरला प्रशिक्षकपदावरुन हटवा- 


गौतम गंभीरला तत्काळ प्रशिक्षकपदावरून हटवावे, अशी मागणीही नेटकऱ्यांकडून बीसीसीआयकडे करण्यात येत आहे. गौतम गंभीरला 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये प्रशिक्षकाचा अनुभव नसल्याचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. एकदिवसीय सामन्यात आयपीएलची तीच रणनीती अवलंबून गौतम गंभीरने चूक केली, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. 






पराभवानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?


रोहित शर्मा या पराभवाबाबत बोलताना म्हणाला की जेव्हा तुम्ही मॅचमध्ये पराभूत होता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट दु:खी करत असते. फक्त 10 ओव्हरची गोष्ट नसते, जेव्हा तुम्हाला मॅच जिंकायची असते तेव्हा सातत्य राखायला लागतं.आम्ही सातत्य राखण्यात अपयशी ठरलो, थोडा निराश झालो आहे, मात्र असं होतं असतं, तुमच्या समोर जे आहे ते बदलायचं असतं. आम्हाला वाटलं डाव्या उजव्या फलंदाजाची जोडी फायदेशीर ठरेल. मात्र वेंडरसेनं चांगली कामगिरी केली, त्यानं सहा विकेट घेतल्या, असं रोहित म्हणाला. आक्रमक फलंदाजी केल्यामुळं 64 धावा केल्या, मी माझं धोरण बदलणार नसल्याचं देखील तो म्हणाला. आम्हाला या खेळपट्टीची माहिती आहे, मधल्या षटकात खेळणं अवघड होऊन जातं. त्यामुळं पॉवरप्लेमध्ये अधिक धावा करण्याचा प्रयत्न केला, असं रोहित शर्माने सांगितले.


भारताला तिसऱ्या सामन्यात विजयाची गरज


श्रीलंकेनं पहिल्या सामन्यात भारताला विजयापासून रोखत मॅच ड्रॉ राखण्यात यश मिळवलं. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का देत श्रीलंकेनं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यामुळं भारताला मालिकेत बरोबरी करणं गरजेचं झालेलं आहे. भारताला काहीही करुन तिसऱ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. 7 ऑगस्ट रोजी तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे.


संबंधित बातमी:


IND vs SL : रोहित शर्मा वगळता इतर फलंदाजांची हाराकिरी, भारताचा 32 धावांनी पराभव, वेंडरसे-असलंकाची धमाल