Mumbai Indians New Jersey : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा काउंटडाऊन सुरु झाला आहे. प्रत्येक संघ आपली नवी जर्सी लाँच करत आहेत. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघाची नवीन जर्सी शनिवारी लाँच करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने अधिकृत सोशल मीडियावरुन आपली नवीन जर्सी लाँच केली आहे.
पाहा नवीन जर्सीचा व्हिडीओ –
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या नवीन जर्सीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांना मुंबईची नवीन जर्सी आवडली आहे. यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे पूर्ण वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबई संघाचा पहिला सामना 27 मार्च रोजी दिल्लीविरोधात खेळणार आहे. आयपीएलच्या लीग सामन्याचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. प्लेअऑप आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक अद्याप जारी करण्यात आलेले नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स खेळणार आहे. सहाव्या विजेतेपदासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे.
मुंबईचे संपूर्ण वेळापत्रक
सामना | कधी | कुठे | कुणाबरोबर | किती वाजता |
पहिला | रविवार, 27 मार्च | ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई | दिल्ली कॅपिटल्स | दुपारी 3.30 वाजता |
दुसरा | शनिवार, 2 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | राजस्थान रॉयल्स | दुपारी 3.30 वाजता |
तिसरा | बुधवार, 6 एप्रिल | एमसीए स्टेडियम, पुणे | कोलकाता नाईट रायडर्स | सायंकाळी 7.30 वाजता |
चौथा | शनिवार, 9 एप्रिल | एमसीए स्टेडियम, पुणे | रॉयल चॅलेजर्स बंगळुरु | सायंकाळी 7.30 वाजता |
पाचवा | बुधवार, 13 एप्रिल | एमसीए स्टेडियम, पुणे | पंजाब किंग्स | सायंकाळी 7.30 वाजता |
सहावा | शनिवार, 16 एप्रिल | ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई | लखनौ सुपरजायंट्स | दुपारी 3.30 वाजता |
सातवा | गुरुवार, 21 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | चेन्नई सुपरकिंग्स | सायंकाळी 7.30 वाजता |
आठवा | रविवार, 24 एप्रिल | वानखेडे स्टेडियम, मुंबई | लखनौ सुपरजायंट्स | सायंकाळी 7.30 वाजता |
नववा | शनिवार, 30 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | राजस्थान रॉयल्स | सायंकाळी 7.30 वाजता |
दहावा | शुक्रवार, 6 मे | ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई | गुजरात टायटन्स | सायंकाळी 7.30 वाजता |
अकरावा | सोमवार, 9 मे | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | कोलकाता नाईट रायडर्स | सायंकाळी 7.30 वाजता |
बारावा | गुरुवार, 12 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | चेन्नई सुपरकिंग्स | सायंकाळी 7.30 वाजता |
तेरावा | मंगळवार, 17 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | सनरायजर्स हैदराबाद | सायंकाळी 7.30 वाजता |
चौदावा | शनिवार, 21 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | दिल्ली कॅपिटल्स | सायंकाळी 7.30 वाजता |
मुंबईचा संघ -
शिलेदार – रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमरा (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (आठ कोटी), कायरन पोलार्ड (सहा कोटी), ईशान किशन (१५.२५ कोटी), डेवाल्ड ब्रेविस (३ कोटी), बसिल थम्पी (३० लाख), मुरुगन आश्विन (१.६ कोटी), जयदेव उनाडकट (१.३० कोटी), मयांक मार्कंडे (६५ लाख), तिलक वर्मा (१.७० कोटी), संजय यादव (५० लाख), जोफ्रा आर्चर (८ कोटी), डॅनियल सॅम्स (२.६० कोटी), टिमल मिल्स (१.५ कोटी), टीम डेव्हिड (८.२५ कोटी), रिले मरेडिथ (१ कोटी), मोहम्मद अर्शद खान (२० लाख)