IND vs SL, 1st ODI : गुवाहाटी येथे सुरु भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या वनडेमध्ये (IND vs SL ODI) भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ज्यामुळे दासून शनाकाच्या श्रीलंका संघाला पहिली वनडे जिंकण्यासाठी 374 धावा कराव्या लागतील. भारताकडून विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने 87 चेंडूत 113 धावा केल्या त्याने केलेल्या या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला आहे. विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 45 वे शतक असून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 73 वे शतक आहे.


विराट कोहलीशिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही उत्कृष्ट खेळी खेळली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. भारतीय कर्णधाराने 67 चेंडूत 83 धावा केल्या तर शुभमन गिलने 60 चेंडूत 70 धावांचे योगदान दिले.


श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या फ्लॉप


रोहित शर्माने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी शुभमन गिलने आपल्या खेळीत 11 चौकार लगावले. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने 29 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र, याशिवाय श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्यासारख्या फलंदाजांनी निराशा केली. श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 28 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 14 धावा केल्या.


श्रीलंकेच्या गोलंदाजांची अवस्था बिकट


श्रीलंकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, कासून रजिथा हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कसून राजिताने 10 षटकांत 88 धावांत 3 खेळाडू बाद केले. याशिवाय दिलशान मधुशंका, दाशून शनाका, धनंजय डी सिल्वा आणि चमिका करुणारत्ने यांना 1-1 असे यश मिळाले. तर वनिंदू हसरंगा आणि दुनिथ वेळगे यांना एकही यश मिळाले नाही.


श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला


सामन्यात सर्वात आधी श्रीलंकेचा कर्णधार दाशून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे, दोन्ही संघांमधील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. 3 वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी श्रीलंकेला 50 षटकात 374 धावा करायच्या आहेत.


हे देखील वाचा-


R Ashwin on Jadeja Comeback: आर अश्विनने सांगितलं जाडेजा कधी करणार भारतीय संघात पुनरागमन? म्हणाला...