IND vs SL, 1st ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) भारताने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. आजपासून अर्थात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. गुवाहाटीच्या बरासपारा क्रिकेट स्टेडियमवर नुकतीच नाणेफेक पार पडली असून श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वन-डे मालिकेतून दिग्गज क्रिकेटर जसेकी रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात परतत आहे, तर नेमकी टीम इंडिया कशी आहे पाहूया...


भारतीय संघाचा विचार करता रोहित शर्मा कर्णधार असून हार्दिक पांड्याही जोडीला उपकर्णधार म्हणून संघात आहे. सलामीला मात्र ईशान किशनच्या जागी शुभमन गिलला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली असून केएल राहुल, श्रेयस अय्यर हे बॅटर आहेत. अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल फिरकी गोलंदाजीसाठी असणार आहेत. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी सह उमरान मलिकलाही संधी दिली गेली आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ बहुतांशी टी20 संघा होता तसाच आहेत. नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया...



 

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी कसे आहेत दोन्ही संघ?


अशी आहे टीम इंडिया-


रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर),श्रेयस अय्यर,  हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, उमरान मलिक, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,म युजवेंद्र चहल


अशी आहे टीम श्रीलंका


पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकिपर), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसुन रजिथा, दिलशान मदुशंका


हे देखील वाचा-